शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

दरवर्षी ७६ हजार मुलांना होतो क्षयरोग : डॉ.सुनील खापर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 7:55 PM

भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे उप-महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देलाखात ३७ बाल क्षयरोगींचा मृत्यू५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’

आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे उप-महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी येथे दिली.५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. खापर्डे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘जागतिक क्षयरोग अहवाल २०१६’ नुसार, क्षयरोग रु ग्णांमध्ये मोठी वाढ होत असून, भारतामध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये क्षयरोगाच्या रु ग्णांची संख्या २०१५ मध्ये १.७ दशलक्षवरून २.८ दशलक्षवर पोहोचली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षयरुग्णाला लवकर औषधोपचार मिळावा म्हणून केंद्र शासनाने ‘यूएटीबीसी’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यात शासकीय रुग्णालय, ‘डॉट सेंटर’ व आता खासगी डॉक्टरकडून क्षयरोगाचे निदान करून घेतल्यावर त्याला औषध दुकानातून मोफत औषधी देण्यात येत आहे. सोबतच सर्व प्रकारच्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी ‘जीन एक्सपर्ट’ (सीबीनॅट) उपकरण सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.‘एमडीआर’चे ४५ हजार रुग्णडॉ. खापर्डे म्हणाले, क्षयरोगाचे अनियमित औषधोपचार अथवा मध्येच औषधोपचार बंद केल्याने ‘ड्रग रेजिस्टंट’ म्हणजे औषधांना प्रतिसाद न देणारा ‘मल्टीड्रग्ज रेजिस्टंट’ (एमडीआर ) होऊ शकतो. भारतात सध्या या रुग्णांची संख्या ४५ हजार आहे, तर या औषधाचेही ‘रेजिस्टंट’ झालेल्या ‘एक्सडीआर’ रुग्णांची संख्या २-३ हजाराच्या घरात आहे. क्षयरोग कार्यक्रमात काम करणाºया डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांची सहा महिन्यातून एकदा तपासणी केली जात आहे. याशिवाय रुग्ण तपासणीच्या खोल्या हवेशीर ठेवण्याच्या, सर्वांसाठी मास्क उपलब्ध करून देण्याच्या व इतरही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.डॉ. खापर्डे म्हणाले, बालकांमध्ये क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण मोठे असण्याचे कारण म्हणजे लवकर निदान न होणे हा आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार न मिळणे. लवकर निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ‘सीबीनॅट’ उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोबतच पाण्यात विरघळणारी व मुलांच्या आवडीच्या चवीची औषधेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आहारासाठी लवकरच दरमहा विशिष्ट निधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.क्षयरोगाच्या रुग्णांना मिळणार दरमहा ५०० रुपयेडॉ. खापर्डे म्हणाले, क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे. क्षयरोगींना आवश्यक उपचारासोबतच त्यांचे योग्य पोषण व्हावे व रोग लवकर बरा व्हावा यासाठी शासनाच्यावतीने प्रत्येक क्षयरोगाच्या रुग्णाला आहार खर्च म्हणून दरमहा ५०० रुपये देण्याची योजना आहे. लवकरच याला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर