शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आवाहन; कोसळला प्रतिक्रियांचा मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:23 PM

आपल्याला कोरोनाची लक्षणे नसतानाही त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली व आपण गृह विलगीकरणात आहोत, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशा आशयाची एक पोस्ट मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी संध्याकाळी फेसबुकवर टाकली आहे.

ठळक मुद्देसाठ हजार लाईक्स आणि १२ हजार कॉमेंटस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आपल्याला कोरोनाची लक्षणे नसतानाही त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली व आपण गृह विलगीकरणात आहोत, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशा आशयाची एक पोस्ट मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी संध्याकाळी फेसबुकवर टाकली. त्यांच्या या आवाहनावर चाहत्यांनी व टीकाकारांनी प्रतिक्रियांचा मुसळधार पाऊस पाडला.बुधवारी संध्याकाळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या आलेल्या आदेशानंतर नागपुरात उलटसुलट प्रतिक्रियांचा महापूर उसळला.मुंढे कसे अरेरावीने वागत होते आणि त्यांनी कसे नगरसेवकांना नाराज केले इथपासून ते मुंडे असल्यामुळेच नागपुरातील कोरोना आटोक्यात राहिला इथपर्यंतच्या प्रतिक्रिया अजूनही सोशल मिडियावर उमटत आहेत.उलटसुलट प्रतिक्रियांचा पूरमुंडे साहेब, तुम्ही गृहविलगीकरणात न राहता एखाद्या कोविड सेंटरमध्ये जाऊन रहायला हवं होतं. तेव्हा तुम्हाला तेथील खरी परिस्थिती कळली असती. कोविड सेंटरमध्ये दाखल व्हा.. आणि एक उदाहरण स्थापित करा.. इथपासून ते मुंढे सर, लवकर बरे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत पर्यंतच्या प्रतिक्रिया नागरिकांनी सोशल मिडियावर उमटवल्या आहेत.सर तुम्ही युवा वर्गाचे आदर्श आहात, लढवय्ये आहात,कोरोनाला तुम्हीच हरवू शकता..योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते..आपल्यासारख्या व्यक्तीची देशाला गरज आहे..अशी आहे मुंढे यांची पोस्ट-

All is Well...!मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ आॅगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वत:ला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिदेर्शांचे पालन करीत आहे.ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिदेर्शांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी.ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो.

All is Well...!

https://www.facebook.com/ShriTukaramMundhe/posts/2031963516938503

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे