लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९५ वा वर्धापनदिन ४ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी इतिहास संशोधक डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी अहमदाबाद येथील गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.आर.शेठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे असतील. तर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती असेल. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार तसेच इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.विद्यापीठाच्या ९५ व्या वर्धापनदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कारासमवेतच आदर्श विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची कुलगुरू डॉ.काणे यांनी गुरुवारी घोषणा केली.
लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ ८४ अर्जचएरवी कुठलेही सन्मान किंवा पुरस्कार मिळाला की विद्यार्थ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा व नवा उत्साह मिळतो. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नेमके विरुद्ध चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विद्यापीठाने शैक्षणिक व अभ्यासेतर विविध उपक्रमात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. याकरिता महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आले होते व विद्यार्थ्यांना याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ ८४ विद्यार्थ्यांचेच अर्ज आले. यात २५ मुले व ५९ मुलींचा समावेश आहे. २०१६ साली हाच आकडा १३३ इतका होता. इतक्या कमी प्रमाणात अर्ज येण्यामागे महाविद्यालये व विद्यार्थ्यांची अनास्था आहे की विद्यापीठ प्रशासनालाच विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात अपयश आले असा प्रश्न निर्माण झाला आहे.