लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आवाजाचा जादूगर ज्याच्या गीतांनी संगीताच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले, असे प्रसिद्ध पार्श्वगायक मो. रफी यांच्या आठवणीत ‘डायमंड फॉरेव्हर मोहम्मद रफी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून नागपुरातील प्रसिद्ध गायकांनी रफींच्या गीतांची सुरेल माळ कार्यक्रमातून ओवली. भावनांना स्पर्श करणारी त्यांची गीते रसिकांच्याही ओठांवर सहजतेने उमलली. आजही आवाजाच्या या जादूगाराच्या आठवणीत सादर झालेल्या या श्रवणीय कार्यक्रमातून हीच दाद मिळाली तुम मुझे यू भूला ना पाओंगे...श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीद्वारे आयोजित या कार्यक्रमाचे सादरीकरण सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते. समीर पंडित यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक सागर मधुमटके, सारंग जोशी, विजय चिवंडे, श्रद्धा जोशी, श्रेया खराबे आणि सोनाली दीक्षित यांनी रफींची सदाबहार गीते सादर कली. कार्यक्रमाची सुरुवात सारंग जोशी यांनी मेरी आवाज सुनो... या गीताने केली. त्यानंतर चौदहवी का चाँद..., मै कही कवी ना बन जाऊ..., नजर ना लग जाये..., दर्दे दिल दर्दे जिगर... यासारखी बहारदार गीते गायकांनी सादर केली. या गीतांबरोबरच मो. रफी यांच्या जीवनाचा प्रवास निवेदनाच्या माध्यमातून डॉ. मनोज साल्पेकर यांनी उलगडला. रिमझिम पावसांच्या बरसणाऱ्या सरींनी गार झालेल्या वातावरणात तुम ने मुझे देखा..., हुवी श्याम उनका खयाल आ गया..., आशा ओ के सावन मे... यासारख्या श्रवणीय गीतांनी चांगलीच रंगत भरली. बेखुदी में सनम..., ना जा कहीं अब न जा..., एहसान तेरा हो गा मुझपे... सारख्या विरहाच्या भावना छेडणाऱ्या गीतांनाही रसिकांनी दाद दिली. या कार्यक्रमातून जवळपास २६ गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात वाद्यांवर राजा राठोड, मंगेश, ऋग्वेद पांडे, प्रशांत नागमोते, नंदू गोहोणे, अशोक टोकोलवार यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.
तुम मुझे यू भुला ना पाओंगे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:52 PM
आवाजाचा जादूगर ज्याच्या गीतांनी संगीताच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले, असे प्रसिद्ध पार्श्वगायक मो. रफी यांच्या आठवणीत ‘डायमंड फॉरेव्हर मोहम्मद रफी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून नागपुरातील प्रसिद्ध गायकांनी रफींच्या गीतांची सुरेल माळ कार्यक्रमातून ओवली. भावनांना स्पर्श करणारी त्यांची गीते रसिकांच्याही ओठांवर सहजतेने उमलली. आजही आवाजाच्या या जादूगाराच्या आठवणीत सादर झालेल्या या श्रवणीय कार्यक्रमातून हीच दाद मिळाली तुम मुझे यू भूला ना पाओंगे...
ठळक मुद्देमो. रफी यांच्या गीतांचा श्रवणीय नजराणा