शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:02 PM

गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने ‘कोरोना’ काळात विद्यार्थ्यांना केवळ दिलासाच मिळालेला नाही तर स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा निकाल ८.२१ टक्के तर नागपूर शहराचा निकाल ८.१२ टक्के वाढला हे विशेष.

विज्ञान शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील चैतन्य अय्यर याने ९९.२३ टक्के (६४५ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापाठोपाठ सोमलवार रामदासपेठ येथील विद्यार्थिनी सन्मती पांडे ही ९७.२ टक्के (६३२ गुण) प्राप्त करत दुसऱ्या क्रमांकावर आली. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश ढवळे याने ९७.०८ टक्क्यांसह (६३१ गुण) तिसरा क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेत सी.बी.आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी आयुषी नवगाजे ही ९६.१५ टक्के (६२५ गुण) प्राप्त करत प्रथम आली. तर याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गुंजन सहा व यशा दशोत्तर यांनी ९६ टक्के (६२४ गुण) मिळवत दुसरा क्रमांक मिळविला.कला शाखेतून ‘एलएडी’ महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैभवी कोहळे हिने ९४.१५ टक्के ( ६१२ गुण) मिळवत पहिले स्थान पटकाविले तर तेथीलच श्रेया दवे हिने ९४ टक्क्यांसह (६११ गुण) दुसऱ्या स्थानावर आली. ‘एमसीव्हीसी’मध्ये सिद्ध भोंगाडे हा टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आला.विज्ञान शाखा१ चैतन्य अय्यर डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९९.२३ %२ सन्मती पांडे सोमलवार कनिष्ठ महाविद्यालय, रामदासपेठ ९७.२० %३ प्रथमेश ढवळे शिवाजी विज्ञान महाविद्यालय ९७.०८ %वाणिज्य शाखा१ आयुषी नवगाजे सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.१५ %२ गुंजन सहा सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %२ यशा दशोत्तर सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %३ कामाख्या नाडगे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %३ समिक्षा भिडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %कला शाखा१ वैभवी कोहळे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.१५ %२ श्रेया दवे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.०० %३ अनुश्री वखरे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९३.५४ %विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजीनागपूर विभागातून ७६,८९० पैकी ७२,३७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१३ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२६ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,२३८ पैकी २८,७१५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९४.९६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.७५ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ९०.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.५३ टक्के इतका राहिला.नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी              सहभागी     उत्तीर्ण     टक्केवारीविद्यार्थी ३०,९५४     २७,९०९    ९०.१६विद्यार्थिनी ३०,२३८  २८,७१५  ९४.९६एकूण       ६१,१९२    ५६,६२४  ९२.५३उपराजधानीतील उत्तीर्णांची टक्केवारी             सहभागी   उत्तीर्ण     टक्केवारीविद्यार्थी १८,५७०     १६,८३७    ९०.६७विद्यार्थिनी १८,८८५  १७,९८१    ९५.२१एकूण      ३७,४५५ ३४,८१८    ९२.९६गुणपडताळणीसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज१७ जुलैपासून गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी ऑललाईन अर्ज करता येणार आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतिसह २७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येणार आहे.उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी शुल्क भरुन संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ.रविकांत देशपांडे यांनी दिली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर