नागपूर : कोरोनामुळे वकिलांचे लागोपाठ मृत्यू होत आहेत़ रोज एक-दोन वकिलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडत आहे़ या महिन्यात आतापर्यंत वीसवर वकील कोरोनाचे बळी ठरले आहेत़ त्यामुळे विधी क्षेत्र शोकमग्न झाले आहे़ कोरोनाच्या आघातापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वकील मंडळी एकमेकांना करीत आहेत़
शहरातील ॲड. सविता कुरेकार, ॲड. चंद्रशेखर जनबंधू, ॲड. आऱ एम़ दारुवाला, ॲड. वाय़ टी़ सराफ, ॲड. अतुल कान्होलकर,ॲड. राहुल पांडे, ॲड. श्रीकांत बावनथडे, ॲड. मनमोहन उपाध्याय, ॲड. सुनील चंचलानी, ॲड. श्रीकांत सावजी, ॲड. आऱ टी़ गेडाम, ॲड. मनोज लाला, ॲड. उपेंद्र व्यास, ॲड. रमेश रायभंडारे, ॲड. मुरलीधर मोहोकार,ॲड. संदेश भालेकर यांच्यासह इतर काही वकिलांचा कोरोनाने बळी घेतला आहे़ यापैकी काही वकिलांची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती़ त्यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने आर्थिक मदत केली; तसेच अनेक वकिलांनी वैयक्तिक स्तरावरही आर्थिक सहकार्य केले़
------------
उच्च न्यायालयात लसीकरण शिबिर
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्यावतीने मेच्या पहिल्या आठवड्यात वकील, त्यांचे कुटुंबीय व लिपिकांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे़ त्यासाठी २९ एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ वकिलांना कोरोना संक्रमनापासून वाचवण्यासाठी विशेष आरटीपीसीआर टेस्ट व लसीकरण शिबिर आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती़ त्यानुसार, संघटनेने हे शिबिर आयोजित केले आहे़