लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने आयोजित योगासन स्पर्धेत उपराजधानीतील तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी पहाटे योगासने सादर केली. स्व. भानुताई गडकरी आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला होता. शहरातील सुमारे १४५ शाळांमधील २० हजार मुले सकाळी साडेसहापासूनच यशवंत स्टेडियमवर हजर झाली होती. सातच्या सुमारास स्पर्धेला प्रारंभ झाला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, समाजसेविका कांचन गडकरी, योगाभ्यासी मंडळाचे संस्थापक रामभाऊ खांडवे, नगरसेविका रुपा राय, वनविभागाचे सुनिल सिरशीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.आंतरशालेय योगासन स्पर्धा निकाल असा-सांघिक१- हिंदू मुलींची शाळा२- कलोडे स्कुल३- न्यू मेरिडियन स्कुललयबद्धता१- बी.आर. ए. मुंडले२- एनएमसी नेताजी मार्केट३- न्यू चैतन्य स्कुलतालबद्धता१- राजेंद्र हायस्कूल२- जिंदल पब्लिक स्कुल३- केशव नगर शाळाआसनकृती१- सरस्वती शिशु मंदिर२- गजानन हायस्कूल३- भिडे गर्ल्स हायस्कूलगती१- पं. बच्छराज विद्यालय२- बी.जी. श्राफ विद्यालय३- दयानंद आर्य कन्यापूर्णस्थिती१- तेजस्विनी कॉन्व्हेंट२- जी.एच. रायसोनी३- ज्ञानविकास माध्यमिकसंख्या१- सरस्वती विद्यालय, शंकर नगर२- सोमलवार हायस्कूल, रामदास पेठ३- दिनानाथ हायस्कूलमौन१- मुंडले पब्लिक स्कुल२- अवधेशानंद पब्लिक स्कुल३- न्यू लूक कॉन्व्हेंटअत:योगानुशासन१- प्रतापनगर स्कूल२- सेवासदन सक्षम३- शाहू गार्डन स्कुलगणवेष१- सोमलवार, रामदास पेठ२- गायत्री कॉन्व्हेंट३- श्रेयस माध्यमिकदिव्यांग विशेष पुरस्कार१- सावनेर मूक बधिर विद्यालय२- अंध विद्यालय३- मूक बधिर विद्यालय, शंकर नगरसर्वोत्कृष्ट विद्यालय१- सरस्वती विद्यालय२- सोमलवार, रामदास पेठ३- निरी विद्यालय
नागपुरात वीस हजार विद्यार्थ्यांनी केली योगासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 2:33 PM
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने आयोजित योगासन स्पर्धेत उपराजधानीतील तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी पहाटे योगासने सादर केली.
ठळक मुद्देआंतरशालेय स्पर्धेचे आयोजन