शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

लुकलुकणारे काजवे आगीत लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:07 AM

ओळख नसलेल्यांची ओळख पटविण्याचा चमत्कार - शोकाकुल जन्मदात्यांची क्रूर थट्टा - डीएनए टेस्ट न करताच मृतदेह पीडितांच्या हवाली ...

ओळख नसलेल्यांची ओळख पटविण्याचा चमत्कार -

शोकाकुल जन्मदात्यांची क्रूर थट्टा - डीएनए टेस्ट न करताच मृतदेह पीडितांच्या हवाली

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - ते जगात आले असले तरी त्यांना जगाची ओळख नव्हती. जग काय, जिने जन्माला घातले तिलाही त्यांनी नीट बघितलं नव्हतं. तर, ९ महिने पोटात सांभाळणाऱ्या माउलीनही त्याला-तिला नीट बघितलं नव्हतं. त्यामुळे त्याचा-तिचा गोड चेहरा जन्मदात्रीलाही व्यवस्थित आठवत नसावा. काजव्याप्रमाणे तो निरागस जीव काही वेळ लुकलुकला अन् आगीत लुप्तही झाला. नियतीने १० जन्मदात्यांवर सूड उगवला तर प्रशासनाने पुढचे पाऊल टाकले. डीएनए टेस्ट केलीच नाही अन् धगधगत्या आगीतून अलगद निखारा काढावा, त्याप्रमाणे होरपळलेल्या ‘त्या’ मृत जीवांची तत्परतेने ओळख पटविण्याचा चमत्कार करून भंडारा रुग्णालयाच्या प्रशासनाने मृत बालकांचे जन्मदाते, त्यांचे आप्तस्वकियच नव्हे तर उभ्या जगाचीही रडकी बोळवण केली.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात केअर युनिटच्या अतिदक्षता विभागात शनिवारी पहाटे २ च्या सुमारास आग लागली. ज्यांना नीट हालचालही करता येत नाही, अशा १० निष्पाप, निरागस जीवांना या आगीने भक्ष्य केले. ही आग कशी लागली, कुणाच्या निष्काळजीपणामुळे लागली, हे शोधण्याच्या घोषणा अन् प्रयत्न सुरू झाले आहे. त्यामुळे अग्निज्वाळा आता काहींच्या नोकऱ्यांना झळ पोहचवू शकतात. ते ध्यानात घेत आपला पदर जळू नये म्हणून संबंधित मंडळींनी आपापल्या अंगावरचे घोंगडे झटकण्याचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळेच की काय संबंधित कोडग्यांनी पीडितांच्या भाव-भावनांनाही रुग्णालयातील आगीच्या हवाली करण्याची निर्लज्ज धावपळ चालविली आहे. ज्या आगीने लोखंडी पट्ट्यांना पिघळवले त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या कोवळ्या बालकांची अवस्था काय झाली असेल, हे सहज लक्षात यावे. या बालकांची नाजूक नितळ त्वचा त्यांचा चेहरा खरेच शाबूत राहिला असेल का, या प्रश्नाचे उत्तर अपवादानेच कुणाकडून ‘हो’ मिळेल. दहा पैकी एक दोन बालकांच्या बाबतीत तसे झालेही असेल. मात्र, १० पैकी ९ बालकांचे (एक बिचारा बेवारस म्हणून सापडला होता अन् त्याची प्रकृती चांगली नसल्याने त्याला येथे दाखल केले होते.) कलेवर संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आग विझल्यानंतर लगेच पीडित परिवारांच्या पदरात घातले. हे तुमचेच आहे, असे म्हणत त्या शोकविव्हळ परिवारांना स्मशानाच्या वाटेने लावले. बाळ जन्माला आल्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याची औटघटकेची भावना अन् नंतर काळीज चिरणारे दुख पदरात घेऊन पदरात पडलेल्या मृत जीवाला घेऊन निघालेल्या पीडितांना हे बाळ आपलेच की दुसऱ्याचे ते विचारण्याचे भान असण्याचे कारण नाही. मात्र, ते बाळ त्यांचेच हे संबंधित डॉक्टर, पारिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी एवढ्या लवकर कसे काय ठरवले, हा लाखमोलाचा प्रश्न ठरतो.

---

कशी पटवली लगेच ओळख

प्रसूती तज्ज्ञ, नवजात शिशू तज्ज्ञ आणि त्वचा तज्ज्ञांच्या मते आईने जन्माला घातल्यानंतर पहिले दोन आठवडे शिशू सगळ्यांपासूनच बेखबर असतो. चार आठवड्यांपासून तो प्रतिसाद देणे सुरू करतो. हसणं, आईकडे बघणं , टकटकी लावणं, आकार घेणं त्याच आपलं सुरू होते. ६ आठवड्यांपर्यंत त्याची त्वचा एवढी कोमल असते की गरम वाफेचाही त्याला धोका होऊ शकतो. अशात रुग्णालयाच्या आगीत ज्या १० नवजात बालकांचा बळी गेला, त्यांची आगीनंतर लगेच ओळख पटणे अशक्यच आहे. या संदर्भात बोलताना सुप्रसिद्ध जेनेटिसिस्ट डॉ. विनय टुले म्हणाले की, एक नव्हे १० बालकांचे प्राण गेले. घटनास्थळी गोंधळ उडाला असेल यात शंकाच नाही. त्यामुळे मृतांची अदलाबदली होण्याचा धोका आहे. अशात मातापित्यांच्या हवाली मृतदेह करण्यापूर्वी डीएनए टेस्ट करायला हवी होती.

---

धावपळ, गडबड अन् ...

प्रत्यक्षदर्शींच्या मते पहाटे दोनच्या वेळी जेव्हा आग लागली तेव्हा सर्वच जण साखरझोपेत होते. थंडीचे दिवस असल्याने आगीकडे बराच वेळ कुणाचे लक्ष गेले नाही. नंतर मात्र एकच धावपळ उडाली. निरागस बालक असलेल्या आणि आग लागलेल्या कक्षासमोर खूपच गोंधळ आरडाओरड सुरू झाली होती. आग विझवल्यानंतर घाईगडबडीतच सर्व बालकांना एसएनसीयूतून बाहेर काढण्यात आले. १० जणांचा मृत्यू झाला होता. हादरलेले, गोंधळलेले भंडारा प्रशासन निस्तरण्यासाठी कामी लागले होते. मृत बालकांचे काही नाव नव्हतेच. गळालेल्या त्वचेला साफ करून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीडितांना हाक दिली अन् तो निष्प्राण जीव त्यांच्या पदरात घातला. संबंधित प्रशासनाने या घिसाडघाईतून काय साध्य करण्याचा किंवा दडवण्याचा प्रयत्न केला, हे काही दिवसांनी पुढे येईल.

----