लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिसांनी दोन गुंडांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसं जप्त केली.मोहम्मद फैजान मोहम्मद अकरम अन्सारी (वय २२, रा. आशीनगर) आणि सरफराज खान समद खान (वय २२, रा. ताजनगर, टेका) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानुसार, शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास पोलिसांनी पाचपावलीतील ताजनगरमध्ये छापा घालून एका ठिकाणी फैजान आणि सरफराजला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस आढळली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन मोबाईल तसेच अॅक्टीव्हा जप्त केली.फैजान आणि सरफराज हे दोघेही कुख्यात फैजूलच्या टोळीचे गुंड आहेत. ते जनावरांची अवैध वाहतूक करण्याच्या गोरखधंद्यात सहभागी असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हेही दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या पाळतीवर होते. या दोघांकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त संजीव कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत, सहायक निरीक्षक योगेश चौधरी, हवलदार रफिक खान, शैलेश पाटील, नायक अरुण धर्मे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, हरीश बावणे, राजू पोतदार आणि सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.शहरात घोड्यांचा बोलबालालकडगंज पोलिसांनी शुक्रवारी ३० जिवंत काडतूस आणि रायफलसह तिघांना अटक केल्याची घडामोड चर्चेत असतानाच गुन्हे शाखेने पुन्हा दोन पिस्तूल पकडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी वर्तुळात अग्निशस्त्राला (पिस्तूल, रायफल) घोडा म्हणतात. सध्या नागपुरात घोड्यांचा बोलबाला आहे. अधूनमधून पकडले जात असल्याने तेवढी चर्चा होते. गुन्हेगारी वर्तुळात घोड्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे.
नागपुरात दोन पिस्तुलांसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:35 AM
गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिसांनी दोन गुंडांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसं जप्त केली.
ठळक मुद्देतीन काडतूसही जप्त : गुन्हे शाखेची कारवाई