लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना छापा मारून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख २८००रुपये आणि २१ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. अमन अनिल यादव ( वय २२, रा. पटेल नगर) तसेच अजय मुरलीधर गाते (वय २५, रा. गोंडवाना चौकाजवळ नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खदान वस्तीत रेल्वेलाईन जवळ अमन यादव आणि अजय गाते गावठी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती सदर पोलिसांना गुरुवारी सायंकाळी मिळाली. त्यावरून पोलिसांनी या दोघांच्या अड्ड्यावर छापा घातला. तेथे अमन आणि अजय गावठी दारूची मद्यपींना अवैध विक्री करताना सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून दारू विक्रीचे २८०० रुपये तसेच २१ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध दारुबंदी कायद्याचे कलम तसेच साथरोग अधिनियम सहकलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे ठाणेदार महेश बनसोडे, द्वितीय निरीक्षक अमोल देशमुख, यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे, फौजदार अजय गरजे, हवालदार विनोद तिवारी, नायक रवींद्र, विजेन्द्र यादव, सुधीर मडावी, सय्यद हबीब आणि शिपाई संदीप पांडे यांनी ही कारवाई केली.
नागपुरात अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 8:46 PM
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना छापा मारून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख २८००रुपये आणि २१ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली.
ठळक मुद्देरोख आणि हातभट्टीची दारू जप्त : सदर पोलिसांची कारवाई