शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

नागपुरात संघ मुख्यालय परिसरात चित्रण करणारे बंगळुरूचे दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 9:47 PM

संघ मुख्यालयाचे चित्रण करण्याच्या प्रयत्न करून बंगळूरूच्या दोन तरुणांनी सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. या दोघांना ताब्यात घेऊन तब्बल १५ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्दे१५ तास कसून चौकशीसुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघ मुख्यालयाचे चित्रण करण्याच्या प्रयत्न करून बंगळूरूच्या दोन तरुणांनी सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. या दोघांना ताब्यात घेऊन तब्बल १५ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर ते शॉर्ट फिल्म बनविणारे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना पोलिसांनी मोकळे केले.फैजल (वय ३२) आणि निलोत्तम (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही बंगळुरू शहरातील रहिवासी आहेत. डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म मेकर असलेले हे दोघे रायपूरला आयोजित इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. ते आटोपल्यानंतर गुरुवारी ते रायपूरहून नागपुरात पोहचले. बंगळुरूला जाणारी ट्रेन मध्यरात्री होती. त्यामुळे त्यांनी नागपुरातील काही ऐतिहासिक स्थळांची पाहणी करण्याच्या हेतूने फिरत फिरत संघ मुख्यालयाचा परिसर गाठला. गुरुवारी रात्री ते ८ च्या सुमारास संघ मुख्यालयाच्या परिसरात पोहचले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी यापूर्वी संघ मुख्यालयावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक पोलिसांनी तो उधळून लावला. तेव्हापासून दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर संघ मुख्यालय आहे. त्यामुळे येथे अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. २४ तास सशस्त्र सुरक्षा रक्षक डोळळ्यात तेल घालून संघ मुख्यालयाभोवती तैनात असतात.फैजल आणि निलोत्तम या परिसराची वेगवेगळळ्या अँगलने ते फोटोग्राफी करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. सशस्त्र पोलिसांनी पकडल्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. त्यात त्यांची नावे, भाषा अन् एकूणच वर्तन सुरक्षा यंत्रणांचाही संशय वाढवणारे ठरले. त्यामुळे दोन संशयीत संघ मुख्यालय परिसरात फोटोग्राफी करताना पकडल्याचे वृत्त पोलीस दलात व्हायरल झाले. परिणामी सुरक्षा यंत्रणात प्रचंड खळबळ उडाली. वरिष्ठांनी त्यांना कोतवाली ठाण्यात आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार या दोघांना कोतवाली ठाण्यात आणून त्यांची गुरुवारी रात्री ९ वाजतापासून तो आज दुपारी १२ वाजेपर्यंत कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, एटीएस आणि नक्षलविरोधी अभियानाची मंडळीही ठाण्यात पोहचली.बंगळुरू पोलिसांकडून शहानिशास्थानिक वरिष्ठांनी बंगळुरू पोलिसांशी संपर्क साधला. दोघांचाही रेकॉर्ड मागविण्यात आला. त्यातून त्यांची शहानिशा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी नसल्याचे आणि त्यांचा रेकॉर्ड वादग्रस्त नसल्याचा अभिप्राय बंगळुरू पोलिसांकडून मिळाला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला. परिणामी या दोघांना शुक्रवारी दुपारी मोकळे करण्यात आले.काहीही संशयास्पद नाही : पोलीस आयुक्तया संबंधाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क करून त्यांना विचारणा केली असता त्यांनी फैजल आणि निलोत्तम फिल्म मेकर असल्याचे आणि त्यांच्याकडे काही संशयास्पद वस्तू अथवा साहित्य आढळले नसल्याचे सांगितले. त्यांची सर्व बाजूने चौकशी केल्यानंतर आमचे समाधान झाल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय