शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

महापालिकेचे दोन लाचखोर जेरबंद

By admin | Published: August 26, 2015 3:04 AM

नवीन फ्लॅट स्कीममध्ये महापालिकेचे नळाचे कनेक्शन देण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्यासह दोघांच्या मंगळवारी एसीबीने मुसक्या बांधल्या.

नागपूर : नवीन फ्लॅट स्कीममध्ये महापालिकेचे नळाचे कनेक्शन देण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्यासह दोघांच्या मंगळवारी एसीबीने मुसक्या बांधल्या. रमेश हिरामण कोहाड (वय ५०) आणि राहुल रमेश उंबरकर (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही महापालिकेच्या नेहरूनगर झोन क्रमांक ५ मध्ये अनुक्रमे शाखा अभियंता तसेच आॅफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत.तक्रारदार प्रशांत पंजाबराव सौदागर हे दहलीज बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स येथे नोकरीला आहेत. बिल्डरने आराधना नगर, दिघोरी येथे दोन सहनिवास प्रकल्प (फ्लॅट स्कीम) तयार केल्या आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन घेण्याकरिता नेहरू नगर झोन क्र. ५ मध्ये बिल्डरतर्फे रीतसर अर्ज करण्यात आला होता. २४ आॅगस्टला राहुल उंबरकरने सौदागर यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. नळ कनेक्शनसाठी प्रत्येकी ७ या प्रमाणे एकूण १४ हजार रुपये द्यावे लागतील, तुम्ही कोहाड साहेबांशी बोलून घ्या, असे तो म्हणाला. बिल्डरला विचारून सांगतो, असे म्हणत सौदागरने सरळ एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जैन यांनी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सौदागरने उंबरकर आणि कोहाडला लाच देण्याची तयारी दाखवून त्यांच्याशी सौदेबाजी केली. १४ ऐवजी १२ हजारात सौदा पक्का केल्यानंतर मंगळवारी दुपारी सौदागर कोहाडच्या कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन गेले. त्यांच्याकडून लाच स्वीकारताच बाजूलाच दबा धरून बसलेले पोलीस उपअधीक्षक किसन पवार, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, हवालदार संजय ठाकूर, मिलिंद हलमारे, मनीष कावळे, प्रभाकर बल्ले, संतोष मिश्रा यांनी कोहाड आणि उंबरकरच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी)