लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: उपराजधानीत कोरोना संशयितत रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मेडिकलमध्ये आधीपासून एक संशयित रुग्ण उपचार घेत असताना बुधवारी आणखी दोन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात २३ वर्षीय तरुणी असून दुसरा ४२ वर्षीय पुरुष आहे.संशयित रुग्णांत २३ वर्षीय तरुणी ही नागपूरच्या दिघोरी येथील रहिवासी आहे. चीनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती चीन येथून नागपुरात आली. दोन दिवसांपासून तिला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. यामुळे बुधवारी दुपारी १.१५ वाजता मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये दाखल करण्यात आले. तर दुसरा संशयित रुग्ण औरंगाबाद येथील आहे. चीनमध्ये व्यावसायिक कामासाठी गेला होता. नागपुरात आला असताना लक्षणे आढळून आली. यामुळे त्यालाही दाखल करून घेण्यात आले. दोन्ही रुग्णांचे नमुने इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व रुग्णालयाकडे (मेयो)पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी थायलंड येथून परतलेल्या एका कोरोना विषाणू संशयित रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. परंतु तीन दिवस होऊन अद्यााप अहवाल प्राप्त झाला नाही. सध्या या तिन्ही रुग्णांची प्रकती स्थिर असून त्यांच्या लक्षणावर उपचार केले जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संशयित रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या वॉर्ड क्र. २५ मध्ये संशयित रुग्णाला ठेवले जात आहे. तिथे मेडिसीन विभागाच्या सामान्य रुग्ण भरती आहे. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक आहे. संशयित रुग्णांचे उशिरा होत असलेले निदान आणि यात कोणी पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
नागपुरात चीनमधून परतलेले दोन कोरोना संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:20 IST