लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यावर गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. परंतु ९५ लाख खर्च करून बांधण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये साचलेला कचरा व निर्माल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. टँक लिकेज असल्याने तलावात घाण पाणी पाझरते. १७ लाखांहून अधिक खर्च करून बांधलेले फाऊंटन पाण्यात बुडाले आहे. ७२ लाखांची खाऊ गल्ली धूळखात आहे. अन्य प्रकल्पांचीही अशीच अवस्था झाल्याने महापालिकेचे दोन कोटी पाण्यात बुडाले आहे.गांधीसागर तलावातील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी तलावाच्या एका कोपºयात मूर्ती विसर्जन टँक बांधण्यात आला आहे. परंतु काम निकृष्ट केल्याने यातील दूषित पाणी तलावात पाझरते. १.४४ लाखांचा खर्च करून तलावाच्या काठावर चाफा झाडांची लागवड करण्यात आली होती. फाऊंटनवर १७.३० लाख, उद्यानावर १५ लाख, उद्यानातील शौचालयावर २७ लाख तर रंगरंगोटी व स्वच्छतेवर ५.५० लाखांचा खर्च करण्यात आला. शौचालये व खाऊ गल्ली अशा विकास कामांवर २ कोटी १० लाखांचा खर्च गेल्या वर्षभरात करण्यात आला. परंतु गांधीसागर तलाव परिसरात फेरफटका मारला तर करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याचे निदर्शनास येते.प्रदूषण थांबले नाहीमूर्ती विसर्जनामुळे होणारे तलावाचे प्रदूषण थांबावे या हेतूने तलावाच्या काठावर टँक बांधण्यात आला आहे. परंतु यात कचरा व निर्माल्य अजूनही साचलेले आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टँक लिकेज असल्याने दूषित पाणी तलावात पाझरते. यामुळे तलावाचे प्रदूषण होते.फाऊंटन कधी बंद कधी सुरूगांधीसागर तलावाच्या सौदर्यात भर पडावी, यासाठी फाऊंटन उभारण्यात आले आहे. यावर १७ लाख ३० हजारांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु फाऊंटन कधी बंद तर कधी सुरू असते. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या काही महिन्यांपासून फाऊंटन बंद आहे.शौचालयावर २७ लाखांचा खर्चचाचा नेहरू उद्यानात २७ लाख खर्च करून शौचालय उभारण्यात आले आहे. परंतु या कामावर इतका खर्च शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गांधीसागर परिसरातील दोन्ही उद्यानाच्या सौंदर्यीकरणावर ४० ते ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु उद्यानात कचरा साचलेला असतो.गैरकारभाराची चौकशी करागांधीसागर परिसर, खाऊ गल्ली, शौचालय बांधकाम, उद्यानांची देखभाल व सौंदर्यीकरण, फाऊंटन अशा विविध कामांवर दोन कोटीहून अधिक खर्च करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात इतक्या खर्चाची कामे झालेली नाही. टँकचे काम निकृष्ट दर्जाचे असून फाऊंटन पाण्यात बुडाले आहे. शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केली आहे. ं
गांधीसागरात बुडाले दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 1:16 AM
उपराजधानीचे वैभव असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यावर गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.
ठळक मुद्देविसर्जन टँकमुळे दुर्गंधी : फाऊंटन पाण्यात बुडाले, लावलेली झाडे बेपत्ता