लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता नसताना महापालिकेच्या रुग्णालयांनीच गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेकांचे आयुष्य वाचविणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था आता वाईट असून या रुग्णालयांचेच जीवन वाचविण्याची वेळ आली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी नागपूर महापालिकेने पुढाकार घेतला असून या रुग्णालयात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणे असणे आवश्यक आहे. या उपकरणासाठी राज्य सरकारकडून दोन कोटी रुपये देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.महापालिकेतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरण कामाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, रुतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, आरोग्य उपसंचालक डॉ.के.बी. तुमाने, आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, केअरिंग इंडियाचे गुरमीत सिंग विज, डॉ. प्रवीण गंटावार, जयप्रकाश गुप्ता गिरडे उपस्थित होते. यावेळी युरीनद्वारे कॅन्सरची तपासणी करणाºया ‘कॅन किट’चे लोकार्पण करण्यात आले.या वेळी बावनकुळे म्हणाले, प्राथमिक आरोग्य सेवा देण्यामध्ये मनपा रुग्णालयांचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा असणेही आवश्यक आहे. परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने इंदिरा गांधी रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयातून पुढेही उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराला सहकार्य करीत शासनाकडून अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार : महापौरएकेकाळी मनपाच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी असायची. आज रुग्णालयांची झालेली दुरवस्था सुधारण्यासाठी मनपाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे. शिवाय टाटा ट्रस्टच्या माध्यमातूनही रुग्णालयांचा कायापालट होत आहे. टाटाच्या सहकार्याने आतापर्यंत मनपा रुग्णालयातील १७ ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. यासाठी आवश्यक तो निधीही पुरविण्यात येत आहे. इंदिरा गांधी रुग्णालयात आता मनपाच्या पुढाकाराने दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
नागपूर मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयासाठी दोन कोटी : पालकमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:20 AM
महापालिकेच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता नसताना महापालिकेच्या रुग्णालयांनीच गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेकांचे आयुष्य वाचविणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था आता वाईट असून या रुग्णालयांचेच जीवन वाचविण्याची वेळ आली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी नागपूर महापालिकेने पुढाकार घेतला असून या रुग्णालयात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणे असणे आवश्यक आहे. या उपकरणासाठी राज्य सरकारकडून दोन कोटी रुपये देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
ठळक मुद्देरुग्णालयाचे नूतनीकरण होणार