शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

नागपुरातील त्या इस्पितळाचे दोन दिवसाचे बिल १,६६,००० !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:43 AM

छिंदवाडा येथे एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाºया गरीब रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु रुग्णालयाने दोन दिवसाच्या उपचाराचे बिल १ लाख ६६ हजार काढले. रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, रुग्णाच्या मृत्यूनंतर ७५ हजार रुपये देऊनही रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेले नातेवाईक व शेजारी एकत्र आले. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दुसºया दिवशी मृतदेह मिळाला. या प्रकरणाला घेऊन मृताचा पत्नीने होप हॉस्पिटलचे संचालक व कर्मचाºयांविरूद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुसऱ्या दिवशी मिळाला मृतदेहछिंदवाडा येथून रुग्णवाहिका चालकाने आणले होप इस्पितळात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छिंदवाडा येथे एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाºया गरीब रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु रुग्णालयाने दोन दिवसाच्या उपचाराचे बिल १ लाख ६६ हजार काढले. रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, रुग्णाच्या मृत्यूनंतर ७५ हजार रुपये देऊनही रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेले नातेवाईक व शेजारी एकत्र आले. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह मिळाला. या प्रकरणाला घेऊन मृताचा पत्नीने होप हॉस्पिटलचे संचालक व कर्मचाऱ्यांविरूद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.छिंदवाडा मोहननगर रहिवासी करण वर्मा असे मृताचे नाव आहे.करण यांची पत्नी बबली वर्मा यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी घराच्या छतावरून पडून पती जखमी झाले. डोक्याला जबर मार बसला. छिंदवाडा येथील डॉक्टरांनी करणवरील उपचारासाठी नागपूर किंवा जबलपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी नागपुरात चांगला उपचार होण्याची माहिती दिली. यामुळे बुधवार २७ जून रोजी रुग्णवाहिकेतून करणला नागपुरात आणले. कोणत्या रुग्णालयात जायचे हे माहीत नसल्याने रुग्णवाहिका चालकाने कामठी रोड बुद्धाजीनगर येथील होप हॉस्पिटलमध्ये पोहचविले. पहिल्या दिवशी करणवरील शस्त्रक्रियेसाठी ५० हजार रुपये जमा केले. दागिने विकून व उधारीवर घेतलेला हा पैसा होता. शस्त्रक्रियेनंतर गुरुवारी रात्री ९ वाजता होप हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी करणचा मृत्यू झाल्याची सूचना दिली. मृतदेह घेऊन जाण्यापूर्वी रुग्णालयाने उपचाराचे शुल्क ७५ हजार रोख भरण्याची ताकीद दिली. ही माहिती छिंदवाडा व नागपूरमधील नातेवाईकांना दिली. परंतु करणचे नातेवाईक आणि कुटुंबांचीही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांच्याकडून पैसे मिळण्याची अपेक्षा कमीच होती. छिंदवाडा येथील शेजाºयांना याची माहिती दिली. गुरुवारी मुसळधार पाऊस असल्याने शुक्रवारी येण्याचे ठरले. रुग्णालय प्रशासनाला शुक्रवार दुपारपर्यंत पैशांची मदत मिळाल्यास बिल भरण्याची ग्वाही देऊन पूर्ण रात्र पती गेल्याच्या आणि मृतदेह मिळण्याच्या चिंतेत गेले.छिंदवाडा येथील माजी नगरसेवक विजय पाटील आणि त्यांच्या वसाहतीतील लोक वर्गणी गोळा करून शुक्रवारी सकाळी नागपुरात पोहचले. परंतु हॉस्पिटल प्रशासनाने १ लाख ६६ हजाराचे बिल हातात दिले. यावर आक्षेप घेऊन काही रक्कम देण्याची तयारी दर्शवली. परंतु रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण रक्कम भरल्यावरच मृतदेह ताब्यात देण्याची भाषा वापरली.पोलीस निरीक्षकांनी दाखवली तत्परतापाचपावली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता या संदर्भात माहिती मिळताच आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनाही पुढील कारवाईसाठी मृतदेह मिळाला नाही. मृताच्या घरच्या स्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हिवरे आपल्या ताफ्यासह होप हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.नातेवाईक येणार होते म्हणून ठेवला मृतदेहहोप हॉस्पिटलचे संचालक डॉ. बी. के. मुरली यांनी सांगितले, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. त्यांच्याकडून केवळ शस्त्रक्रियेचेच पैसे घेण्यात आले. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुठलाही पैसा मागितला नाही. पोलिसांनाही मृतदेह घेऊन जाण्यास थांबविले नाही. आम्हाला शस्त्रक्रियेचे ५० हजार मिळाले होते. मृताच्या पत्नीच्या विनंतीनंतरच मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला होता. १ लाख ६६ हजार रुपयांच्या बिलाबाबत डॉ. मुरली म्हणाले, डोक्याला जखम असल्याने ६०-७० हजार रुपये खर्च येतो. अतिदक्षता विभागात जास्त दिवस ठेवल्याने बिलात वाढ होते. रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह देण्यासाठी पैशाची मागणी केली नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू