शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

नागपूरच्या सुपर स्पेशालिटी इस्पितळातील दोन डॉक्टरांनी पळविले ८३ हृदयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 10:54 PM

शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना खासगी सेवा देणारे डॉक्टर थेट वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या ‘टार्गेट’वर आहेत. असे असताना ८३ हृदयरोगींना खासगी इस्पितळात पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देमंत्रालयाकडून विभागीय चौकशीचे आदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना खासगी सेवा देणारे डॉक्टर थेट वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या ‘टार्गेट’वर आहेत. असे असताना ८३ हृदयरोगींना खासगी इस्पितळात पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाने घेतली असून मेडिकलशी संलग्न आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांवर विभागीय चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे.गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय वरदान ठरत आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून अशा रुग्णांना निदान, उपचाराचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. मूत्रपिंड, हृदय, पोटाचे विकार आणि मेंदूचे विकार असलेल्या दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना या योजनेच्या माध्यमातून मदत उपलब्ध मिळत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन पैशाच्या लोभापायी येथे सेवा देणारे डॉक्टर येथील रुग्णाला खासगी रुग्णालयात पिटाळून लावतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची बाब भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निदर्शनास आणून दिली. या संदर्भात त्यांनी मंत्रालय स्तरावर तक्रारही केली. सुपरमधून पिटाळून लावलेल्या आणि शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या अशा ८३ रुग्णांची यादीच त्यांनी तक्रारीत नमूद केली आहे. त्याची दखल घेत मंत्रालयाने खासगीत रुग्ण पळवून लावणाऱ्या सुपरमधील दोन डॉक्टरांच्या विभागीय चौकशीची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीदेखील विभागीय चौकशीच्या वृत्ताला दुजोरा दिला.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर