शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:21 AM

बजेरियातील भोईपुरा येथे क्षुल्लक वादातून दोन परिवारामध्ये मारहाण झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देखंडणी वसुलीसाठी धरमपेठेत गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बजेरियातील भोईपुरा येथे क्षुल्लक वादातून दोन परिवारामध्ये मारहाण झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता.पोलीस सूत्रानुसार भोईपुरातील नाथू मंदिरजवळ राहणाऱ्या २३ वर्षीय शिवानी विक्रांत गौर यांच्या घरी रात्री १२ वाजता ऋषभ निर्मल गौर (२३), भावेश यादव (२५), चेतना भावेश यादव (२१), निर्मल गौर (५२), कल्पना निर्मल गौर (४०), दिनेश गौर (३२), नैना दिनेश गौर (२५) आणि त्यांच्या इतर साथीदारांनी हल्ला केला. त्यांनी शिवानी, त्यांचे पती आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. घरासमोरील भागाची तोडफोड केली. या घटनेचा बदला घेण्यासाठी शिवानीने पती विक्रांत गौर, राणी गौर (४५), लक्ष्मी गौर (५५), पंकज गौर (३०), विष्णू गौर (६०), विकास गौर (३०), विक्रांत गौर (२५) यांनी कल्पना निर्मल गौर यांच्या घरावर हल्ला केला. कल्पना व त्यांचे पती आरोपींना समजविण्यासाठी घराबाहेर आले. आरोपींनी शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. गणेशपेठ पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.दुचाकी वाहने पाडली, रेस्टॉरंट संचालकाला धमकावलेधरमपेठ येथील चिल्ड्रन्स पार्कजवळ रविवारी रात्री गुन्हेगारांनी तोडफोड करीत दुकाने बंद करायला लावली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिशय सुरक्षित समजल्या जाणाºया धरमपेठ परिसरात अशी घटना होणे गंभीर आहे.ट्राफिक चिल्ड्रन्स पार्कजवळ अनेक रेस्टॉरंट आहे. शनिवारी आणि रविवारी येथे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक गर्दी असते. रविवारी रात्री तीन-चार युवक येथे आले. ते रेस्टॉरंटसमोर उभे राहून गोंधळ घालू लागले. शिविगाळ करीत रेस्टॉरंट संचालकाला धमकावू लागले. रेस्टॉरंटसमोर पार्क असलेली दुचाकी वाहनेही त्यांनी खाली पाडली. ग्राहकांना जीवे मारण्याची धमकी देत तेथून बाहेर जाण्यास सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अनेक ग्राहक कुटुंबासह आले होते. गोंधळ होत असल्याचे पाहून ते निघून गेले. दरम्यान घटनेची माहिती होता सीताबर्डी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस येताच गुन्हेगार फरार झाले. रेस्टॉरंट संचालकांनी उपस्थित ग्राहकांना शांत केले. पोलिसांनी विचारपूस केली असता कुणीही काही सांगितले नाही, त्यामुळे पोलीसही परत गेले.असे सांगितले जाते की, गोंधळ घालणारे गुन्हेगार होते. ते खंडणी वसुलीसाठी आले होते. यापूर्वीही त्यांनी अनेकदा गोंधळ घातला आहे.वणीच्या महिला डॉक्टरची पर्स लंपासवणी (जि. यवतमाळ) येथील एका महिला डॉक्टरची पर्स सीताबर्डीतील चोरट्यांनी लंपास केली. २० जूनला घडलेल्या या घटनेची तक्रार उशिरा दाखल झाल्याने पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.डॉ. साहिबा अमरिन शेख नईम शेख (वय ३२, रा. जत्रा रोड वणी) २० जूनला नागपुरात आल्या होत्या. सायंकाळी ४ ते ४.४० या वेळेत त्या सिनेमॅक्स मॉल ते व्यंकटेश मार्केटमध्ये खरेदी करीत होत्या. तेवढ्या वेळेत गर्दीत संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या हॅण्डबॅगची चेन उघडून त्यातून पर्स काढून घेतली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख ५ हजार रुपये होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर