नागपूर : नंदनवन पोलिसांच्या चमूने नागपुरात एमपीडीएच्या आरोपीसह खुनाच्या प्रकरणात हवे असलेले कुख्यात गुन्हेगार जाधव बंधूंना भोपाळमध्ये अटक केली आहे. आरोपी जितू सुखदेव जाधवच्या विरुद्ध खुन, हप्ता वसुली, मारपीट, लुटमारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत कारवाईसाठी पोलीस आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याची कुणकुण लागताच जितू फरार झाला होता. त्याच प्रमाणे त्याचा भाऊ राकेश जाधव खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. पोलिसांना आरोपी भोपाळच्या आराधनानगरात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त ईशु सिंधू यांच्या आदेशानुसार आरोपींच्या शोधात पोलीस उपनिरीक्षक एस. टी. अंबुरे, मनोज घोडे, बजरंग, प्रशांत पवार, राकेश शिर्के यांच्या चमूला पाठविण्यात आले. पोलिसांच्या चमूने पहाटे संबंधित घरात छापा मारून आरोपी जितू आणि त्याचा भाऊ राकेशला ताब्यात घेतले. राकेश लकडगंजमधील २०१३ मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपींचा तिसरा भाऊ विकेश तुरुंगात शिक्षा भोगत असून चौथा भाऊ विक्रम फरार आहे. (प्रतिनिधी)
दोन कुख्यात आरोपींना भोपाळमध्ये अटक
By admin | Published: May 09, 2016 2:46 AM