लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनीला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर दोन मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने तिला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही. नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याने परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांकडून तिला दिलासा देण्यात आला नाही व नाईलाजाने तिला पेपर न देताच वापस जावे लागले.परीक्षा केंद्रावर कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांनी दहा किंवा त्या अगोदर पोहोचावे असे निर्देश ‘सीबीएसई’ने अगोदरच दिले आहेत. गुरुवारी दहावीचा गणिताचा पेपर होता. शहरातील एका परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजून २ मिनिटांनी विद्यार्थिनी तिच्या पालकांसह पोहोचली. उशिरा आल्याचे कारण देत सुरक्षा रक्षकांनी तिला प्रवेश नाकारला. तिच्यासह इतर पालकांनी केंद्र चालकांना विनंती केली. कॉटन मार्केट चौकात अपघात झाल्यामुळे उशीर झाला असल्याचे पालकांनी सांगितले. परंतु केंद्रावर नियमांचा हवाला देत तिला परीक्षेला बसू दिले नाही.निर्धारित वेळेपेक्षा उशिराने आल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही, हे ‘सीबीएसई’ने परीक्षा प्रवेशपत्रांवर स्पष्ट केले आहे. संंबंधित विद्याथिर्नी पेपर सुरू झाल्यानंतर आली. त्यामुळे तिला परीक्षा देता येणार नाही. जर तिला परीक्षेला बसू दिले तर तो नियमांचा भंग ठरेल, असे ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक सौरभ भारद्वाज यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.
दोन मिनिटांचा उशीर विद्यार्थिनीला भोवला : परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 1:20 AM
‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनीला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर दोन मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने तिला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही.
ठळक मुद्दे‘सीबीएसई’च्या नियमांचे पालन न केल्याचा फटका