शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन होणार, शहर बनणार गॅस चेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:09 AM

पर्यावरण संवर्धनाबाबत खोटे दावे

आशिष रॉय

नागपूर : पॅरिस करारात भारत वर्ष २०३०पर्यंत ५० टक्के वीज उत्पादन नॉन-जीवाश्म इंधनावर (नॉन-फॉसिल फ्यूएल) आधारित प्रकल्पातून करेल, असा उल्लेख आहे. त्यानंतरही महाजनकोने कोळशावर आधारित वीज उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने नागपूर सीमेपासून ४ किमी अंतरावर कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर शहर आधीच कोराडी आणि खापरखेड वीज केंद्रामुळे वायू प्रदूषणाचा सामना करीत आहे. आता दोन नवीन वीज उत्पादन युनिट स्थापन करण्याचा निर्णय महाजनकोने घेतल्यामुळे आता नागपूर शहर गॅस चेंबर बनण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, असे म्हटले जात आहे. महाजनकोने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) दोन युनिटच्या पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज केला आहे. मंडळाने दि. २९ मे रोजी या संदर्भात जनसुनवाई घेण्याचे ठरविले आहे. उद्योग भवनातील मंडळाच्या कार्यालयात या संदर्भात सादर केलेला प्रस्ताव उपलब्ध आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) महाजनकोला वर्ष २०१० मध्ये कोराडीच्या ६६० मेगावॉट क्षमतेच्या तिन्ही युनिटमध्ये फ्ल्यू गॅस डिसल्फ्युरिझर्स (एफजीडी) बसविण्याचे निर्देश दिले होते. कंपनीने आतापर्यंत एफजीडी बसविले नाहीत. आता महाजेनकोने दोन्ही प्रस्तावित युनिटमध्ये एफजीडी तत्काळ बसविण्याचे आश्वासन दिले आहे.

सध्याच्या कोराडी प्रकल्पातील युनिटला १०० टक्के राखेची विल्हेवाट लावण्यावर यश आले नाही. गेल्या पाच वर्षांत हा आकडा सरासरी ८० टक्के आहे. आता महाजनकोने नवीन युनिटमधून निघणाऱ्या राखेचा उपयोग १०० टक्के करण्याचे आश्वासन दिले आहे. कोराडी केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे राख कन्हान नदीच्या पाण्यात मिसळते आणि पावसाळ्यात प्रकल्पालगतच्या शेतात वाहून जाते. ही नदी नागपूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहे.

नवीन युनिट्सचा सर्वात मोठा तोटा वायू प्रदूषण आहे. महाजनकोच्या सल्लागाराने प्रकल्पाजवळ आठ ठिकाणी प्रदूषणांचे मोजमाप केले आणि त्याची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा चांगली आढळली. हे कार्य वर्ष २०२२च्या मार्च आणि मे महिन्यात करण्यात आले होते. पर्यावरणवाद्यांनी महाजनकोच्या आकड्यांना आव्हान देताना हे कार्य डिसेंबर आणि जानेवारी व्हायला हवे होते, असे म्हटले आहे.

विशेष बाबी 

  • कोराडी केंद्राने १३ वर्षांत एफजीडी स्थापन केले नाही. आता महाजनकोने हे कार्य तत्काळ करण्याचे आश्वासन दिले आहे.
  • कोराडी प्रकल्पात सध्या ८० टक्के राखेचा उपयोग होत आहे. आता नवीन युनिटसाठी १०० टक्के उपयोगाचा दावा केला आहे.
  • कोराडी कोळसा वीज केंद्र नागपूर मनपाच्या सीमेपासून केवळ ४ किमी अंतरावर आहे.
  • वायू प्रदूषणानंतरही कंपनीने सर्वकाही आटोक्यात असल्याचा दावा केला आहे.
टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजnagpurनागपूर