शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विदर्भात दोन नवीन परिमंडळ

By admin | Published: August 17, 2015 2:55 AM

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) नागपूर ग्रामीण परिमंडळाचे विभाजन करू न चंद्रपूर व गोंदिया तसेच अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अकोला आणि अमरावती ...

महावितरणच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन : ऊर्जामंत्र्यांची घोषणा नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) नागपूर ग्रामीण परिमंडळाचे विभाजन करू न चंद्रपूर व गोंदिया तसेच अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अकोला आणि अमरावती परिमंडळ स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महावितरणच्या नागपूर शहर परिमंडळ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे शनिवारी बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. तर मंचावर आमदार सुधाकर देशमुख उपस्थित होते. बावनकु ळे म्हणाले, पुढील महिनाभरात नवनिर्मित परिमंडळ कार्यालये सुरू होणार असून, यापैकी नागपूर ग्रामीण परिमंडळातील चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याकरिता चंद्रपूर परिमंडळ, तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी गोंदिया परिमंडळ तसेच अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अकोला, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी अकोला येथे व अमरावती आणि यवतमाळसाठी अमरावती येथे स्वतंत्र परिमंडळ राहणार आहे. देशातील वीज क्षेत्रात महावितरणचा आवाका फार मोठा आहे. शिवाय महावितरणचे राज्याच्या विकासातही भरीव योगदान राहिले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी यंत्रणेच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी बीओटी तत्त्वावर किंवा खासगी गुंतवणुकीच्या मदतीने महावितरणची कार्यालये सुसज्ज करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या विकासासाठी ७४ कोटींचे वाटप करण्यात येत असून नागपूर शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरू होताच शहरातील वीज तारा भूमिगत करण्यासाठी २५० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जास्तीत जास्त ग्राहकसेवा करण्यासाठी वीज ग्राहकांची संख्या नव्हे, तर भौगोलिक परिस्थितीचा विचार करू न कार्यालयांचे पुनर्गठन व्हावे, एखाद्या अभियंत्याचे पद रिक्त असेल तर ते पद आऊटसोर्र्सिंगच्या माध्यमातून भरण्याचे अधिकार संबंधित मुख्य अभियंता यांना दिल्या जातील, असेही बावनकुळे यांनी संकेत दिले. महापौर प्रवीण दटके यांनी अध्यक्षीय भाषणातून महावितरण हा नागपूरच्या विकासात लक्ष देणारा सर्वांत मोठा विभाग असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला महावितरणच्या नागपूर शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता मोहन झोडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, आर. पी. गोयंका, मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर, सुरेश मडावी, मनोहर लांडे, आर. एम. बुंदेले, आर आर. जनबंधू, यू. बी. शहारे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सत्यजीत राजेशिर्के, उपसंचालक (दक्षता व सुरक्षा) सुमितकुमार, कार्यकारी अभियंता सचिन तालेवार, युवराज मेश्राम, के. पी. भिसे, व्ही. डी. राऊत, पी. एस. तगलपल्लीवार व ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्या गौरी चंद्रायन उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)