लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :जरीपटका पोलिसांनी पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका गुन्हेगारांसह दोघांना अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि २० काडतूस जप्त केले. सध्या हे दोन्ही आरोपी जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.बुधवारी दुपारी मेकोसाबाग लेंडी मैदानातील वाचनालयाजवळ पोलिसांनी शिनू मृगेसन शेट्टीयार (वय २१, रा. संत लहानुजीनगर, जरीपटका) याला अटक केली होती. कॉलेज बॅग घेऊन स्प्लेंडरवर एक तरुण वाचनालयाजवळ बसला आहे, त्याच्याजवळ पिस्तूल आहे, अशी माहिती बुधवारी दुपारी जरीपटका पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन आरोपी शिनूला अटक केली होती. त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस सापडले. चौकशीत हे पिस्तुल आणि काडतून मध्य प्रदेशातील ठाकूरकडून आणल्याचे शिनूने सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडकुवा (जि. सागर) येथे छापा मारून राजकुमार भगवानसिंग ठाकूर (वय ४०) याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे पोसिलांना एक पिस्तुल आणि १८ काडतूस सापडले. पोलिसांनी या दोघांना शस्त्रकायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. शिनू आणि राजकुमारची ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. परिमंडळ पाचचे उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, उपनिरीक्षक वसंत पवार, हवालदार गजेंद्रसिंग ठाकूर, नायक गणेश बरडे, आसिफ शेख, आनंद मरस्कोल्हे, रवी अहिर, गणेश गुप्ता, मुकेश यादव, पवन यादव आणि हरीश इंगळे यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात दोन पिस्तूल, २० काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:50 AM
जरीपटका पोलिसांनी पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका गुन्हेगारांसह दोघांना अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि २० काडतूस जप्त केले. सध्या हे दोन्ही आरोपी जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.
ठळक मुद्देजरीपटका पोलिसांची मध्य प्रदेशात धाव : पिस्तुलाची तस्करी करणाऱ्यांसह दोघे गजाआड