शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

नागपूर महानगर क्षेत्रात दोन सॅटेलाईट टाऊनशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:19 AM

नागपूर शहराच्या जवळ असे छोटे शहर निर्माण करून नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या दोन सुधार योजना सॅटेलाईट टाऊनशिपच्या स्वरूपात निर्माण करण्याचा निर्धार नागपूर महानगर विकास प्राधिकरणने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनागपूर महानगर विकास प्राधिकरणाचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराच्या जवळ असे छोटे शहर निर्माण करून नियोजनबद्ध विकास या ठिकाणी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या खडका-किरमीटी-शिवमडका-सुमठाणा-पांजरी आणि कोतेवाडा-सोंडापार-जामठा-परसोडी या दोन सुधार योजना सॅटेलाईट टाऊनशिपच्या स्वरूपात निर्माण करण्याचा निर्धार नागपूर महानगर विकास प्राधिकरणने व्यक्त केला आहे.मिहान परिसरामध्ये आयआयएम आणि एम्स यासारख्या शैक्षणिक संस्थांमधील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य होईल तसेच चांगले रस्ते, बाजारपेठ आदी सुविधा या ठिकाणी असणार आहेत. या दोन्ही सुधार योजना नागपूर मेट्रोच्या मिहान डेपो लगत असल्याने येथील रहिवाशांना वाहतुकीची सुविधा होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. महानगर प्राधिकरणतर्फे प्रधानमंत्री आवास योजना , कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान, मोठा ताजबाग येथील हजरत ताजुद्दीन बाबा दर्गा, कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर व चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्राहालय आदी प्रकल्प राबविले जात आहे. प्राधिकरणद्वारे राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्रात आघाडीवर आहे. आॅक्टोबर २०१८ पर्यंत गाळे वाटपाचा प्रयत्न आहे.प्राधिकरणाची वर्षपूर्ती४ मार्च २०१७ रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. यात ७१७ गावांचा समावेश असलेल्या महानगर क्षेत्राच्या विकासाला आकार देण्यात येत असून, गृहबांधणी प्रकल्प,रस्त्यांचे जाळे, लॉजिस्टिक हबसारख्या एकाहून एक योजनांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. ४ मार्च २०१८ ला एक वर्ष झाले. या कालावधीत विविध विकास योजना हाती घेण्यात आलेल्या आहे. आजतागायत विकास परवानगीबाबत प्राप्त ४९८ प्रकरणापैकी २३२ प्रकरणाचा निपटारा करण्यात आलेला असून उर्वरीत प्रकरण त्रुटीअभावी मंजूर करण्यात आले नाही. उपरोक्त त्रुटी अर्जदाराकडून पूर्ण करण्यात आल्यानंतर या प्रकरणी तातडीने निर्णय घेतला जाईल तसेच विकासकां कडून अर्ज मागविण्यात आले आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मंजुरी असेल तरच व्यवहार करामहानगर क्षेत्रातील भूखंड सदनिका यांना जिल्हाधिकारी, नासुप्रची मंजुरी प्राप्त असल्याची शहानिशा करूनच भूखंड वा सदनिकांच्या खरेदी -विक्रीचे व्यवहार करावेत. तसेच बांधकामांना आरंभ प्रमाणपत्र प्राप्त असून बांधकाम परवानगीनुसार होत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच गाळे,सदनिका खरेदी करताना विकासकांकडून भोगवटा प्रमाणपत्राची मागणी करावी,असे आवाहन विकास प्राधिकरणद्वारे करण्यात आले आहे.

विकास प्राधिकरण मधील वैशिष्ट्ये

  • उद्योगांना पोषक वातावरण
  • ८६५ किलोमीटरचे नवीन रस्त्यांचे जाळे
  • डोंगरगाव आणि गुमगाव येथे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक हब
  • शेतकऱ्यांकरिता आवश्यक सोईसुविधा
  • मेट्रो मार्गावर नागरी वस्ती डोंगरगाव आणि गुमगाव येथे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक हब
  • शेतकऱ्यांकरिता आवश्यक सोईसुविधा
  • मेट्रो मार्गावर नागरी वस्ती
टॅग्स :nagpurनागपूर