शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

झोपडपट्टीतील दोन मुली तयार करणार उपग्रह!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 1:55 AM

देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये निवड. मनपाच्या शाळांची अवस्था सर्वांना परिचित आहे.  पण सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील या मुलींनी विद्यार्थ्यांनी मनपाच्या शाळेतही गुणवत्ता ठासून भरल्याचा परिचय दिला आहे.

- मंगेश व्यवहारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ७ फेब्रुवारीला जागतिक रेकॉर्ड बनविण्याची तयारी सुरू आहे. देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह बनवित आहेत. ते एकाचवेळी अंतराळात झेपावण्याचा विक्रम होणार आहे. यासाठी देशभरातून निवडलेल्या १००० विद्यार्थ्यांमध्ये नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुली आहेत. 

मनपाच्या शाळांची अवस्था सर्वांना परिचित आहे.  पण सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील या मुलींनी विद्यार्थ्यांनी मनपाच्या शाळेतही गुणवत्ता ठासून भरल्याचा परिचय दिला आहे.  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचा हा उपक्रम आहे.  यात देशभरातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचे  योगदान वाढावे ही यामागील संकल्पना आहे.  यात जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून ७ फेब्रुवारी रोजी ३८००० मीटर उंचीवर सोडण्यात येणार आहेत. हे उपग्रह प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील.  हा एक जागतिक विक्रम होणार आहे.  यासाठी सुरेंद्रगड शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते. यात स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली. 

आमचे विद्यार्थी यापूर्वीही मंगळ अभियानात सहभागी झाले होते. आता रामेश्वरम येथे प्रस्थापित होणाऱ्या जागतिक विक्रमासाठी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड होणे हे गौरवास्पद बाब आहे.  स्लम भागातील ही मुले आहेत. पण शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या मुलांच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर केला आहे. - दीप्ती बिस्ट, विज्ञान शिक्षिका, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा