शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

‘जेल ब्रेक’मध्ये दोघे अडकले

By admin | Published: April 07, 2015 2:03 AM

सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कैदी पलायन प्रकरणाच्या कटात सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक

पाचही कैदी पळाले छिंदवाड्याकडे / पळून जाण्यास मदत; पैसेही मागून दिलेनागपूर : सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कैदी पलायन प्रकरणाच्या कटात सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. नवाब तोहिद खान (वय २२, रा. मानकापूर) आणि गणेश कमलकिशोर शर्मा (वय ३०, रा. ताजनगर) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी बिशनसिंग रामूलाल उईके, शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर या पाच खतरनाक कैद्यांना कारागृहातून पळून जाण्यात सक्रिय मदत केली. राज्यातील सर्वात सुरक्षित समजला जाणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून उपरोक्त पाच खतरनाक कैदी मंगळवारी पहाटे पळून गेले. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी पळून जाण्याचा कट रचला होता. तो अमलात आणण्यासाठी त्यांनी खान आणि शर्मा या गुन्हेगारांची मदत घेतली. हे दोघे जबरीचोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. मोबाईलच्या माध्यमातून शोएब आणि गुप्ताच्या ते दोन आठवड्यांपासून सतत संपर्कात होते. कसे पळायचे, कुठून पळायचे यासाठी पळालेले कैदी आणि खान तसेच शर्मा एकमेकांच्या सतत संपर्कात होते. सोमवारी मध्यरात्री पलायनाचा कट अमलात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. ठरल्याप्रमाणे मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास नवाब खान आणि गणेश शर्मा चुनाभट्टीच्या दिशेला उभे राहिले. फोनवरून मिळणाऱ्या सूचनांनुसार त्यांनी बाहेरून दोर फेकला. त्याआधारे आरोपी बिशन उईके, शिबू खान, सत्येंद्र गुप्ता, प्रेम नेपाली आणि गोलू ठाकूर बाहेर आले. (प्रतिनिधी)१ नातेवाईकांकडून घेतले पैसे नवाब खान आणि गणेश शर्माच्या मोटरसायकल तसेच अन्य एका वाहनावर बसून कैदी मोमीनपुऱ्यातील बकरामंडीत पोहचले. तेथून ते गुप्ताच्या पिवळी नदी येथील नातेवाईकांकडे आले. नातेवाईकांकडून पैसे घेतल्यानंतर आरोपी कोराडी मार्गावर आले. तेथून छिंदवाड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून पाचही खतरनाक कैदी महाराष्ट्राबाहेर पळाले.पुन्हा दोन तुरुंगाधिकारी निलंबितदरम्यान, या प्रकरणात सोमवारी आणखी दोन वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. वैभव आत्राम आणि अशोक मलवाड अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे आता निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या १० झाली आहे. यापूर्वी अधीक्षक कांबळे तसेच तुरुंगाधिकारी पारेकर आणि महाशिखरेला निलंबित करण्यात आले. त्यानंतर शनिवारी राजू पाटील, मंगेश प्रजापती, रमेश ढेकळे, अशोक भांडारकर आणि संजय ठोकळ या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.३ अब तक ४७सोमवारी पुन्हा कारागृहात १२ मोबाईल, ४ सीमकार्ड, ७ बॅटरी आणि चार्जरसह ब्ल्यूटूथही सापडले. मंगळवारपासून कारागृहात सुरू असलेल्या झाडाझडतीत सोमवारपर्यंत एकूण ४७ मोबाईल सापडले. या कारागृहात किमान ५०० मोबाईल असल्याचे वृत्त लोकमतने यापूर्वी वेळोवेळी प्रकाशित केले, हे येथे उल्लेखनीय.४ लोकमतचे वृत्त तंतोतंत दरम्यान खतरनाक कैद्याच्या पलायनाने राज्यभर खळबळ उडाली. कैद्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह शहर पोलिसांची वेगवेगळी पथके कामी लागली. मोबाईल टॉवरवरून सीडीआर काढण्यात आला. त्यात घटनेच्या वेळेदरम्यान तोहिद खान आणि गणेश शर्मांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स अधोरेखित झाले. हे दोघे यापूर्वी कारागृहात उपरोक्त कैद्यांच्या भेटीलाही गेले होते, त्याचीही पुष्टी झाली. त्यामुळे या दोघांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. ‘ठोकपीट’ झाल्यानंतर या दोघांनी कैदी पलायन प्रकरणाच्या कटाचा उलगडा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर केला. त्यांनी या कटात सहभागी असल्याची कबुली देतानाच पळून गेलेल्या कैद्यांबाबतही महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला दिली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री या दोघांना परिमंडळ ४ चे उपायुक्त यिशू सिंधू यांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे, लोकमतने या प्रकरणात प्रकाशित केलेले वृत्त तंतोतंत खरे ठरल्याचे अटकेतील आरोपीच्या जबानीवरून आणि एकूणच घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे. दीक्षितांचे नो कॉमेंटगेल्या तीन दिवसांपासून नागपूरच्या कारागृहात चौकशी करणारे पोलीस महासंचालक (एसीबी) प्रवीण दीक्षित सोमवारी पुन्हा ४ ते ५ तास कारागृहात होते. त्यांच्यासोबत अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. एल. बिष्णोई हे सुद्धा होते. त्यांनी सोमवारी बॉम्ब शोधक-नाशक पथकासह श्वान पथकालाही कारागृहात तपासणीसाठी बोलवून घेतले. मात्र, सोमवारीदेखील त्यांनी पत्रकारांसमोर चुप्पीच साधली. गेल्या तीन दिवसांपासून ते पत्रकारांपुढे येतात, मात्र कसल्याही प्रकारची माहिती उघड होणार नाही, याची ते कटाक्षाने काळजी घेत आहेत.