लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल शॉपी फोडून लाखोंचे मोबाईल्स चोरणाऱ्या एका सराईत जोडगोळीला नंदनवन पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन जेरबंद केले. यातील मुख्य आरोपीचे नाव अभिजित ऊर्फ अपजित सोमनाथ पांडे (वय २९) आहे. तो राजनगर वाठोडा येथे भाड्याच्या खोलीत राहतो. त्याच्यासोबत त्याचा साळाही आरोपी आहे. मात्र, तो अल्पवयीन आहे. साळ्या-भाटव्याच्या या जोडगोळीकडून लाखोंचे मोबाईल्स जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. १८ जूनला वाठोड्यातील मोहम्मद सैफ यांच्या मालकीची एमएस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी तेथून वेगवेगळ्या कंपनीचे ४० मोबाईल्स आणि रोख रक्कम असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला होता. नंदनवन ठाण्याच्या हद्दीतीलच बीडगाव येथील सुमन मोबाईल्स शॉपीसुद्धा फोडण्यात आली होती. येथूनही चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरले होते. या धाडसी चोऱ्यांमुळे परिसरातील व्यापाऱ्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त रौशन आणि नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी सायबर सेलचे कर्मचारी दीपक तऱ्हेकर तसेच मिथून नाईकच्या मदतीने तपासचक्र फिरविले. घटनेच्या वेळी आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि त्यानंतरचे लोकेशन तपासले असता, या घरफोडीतील आरोपी उत्तर प्रदेशमधील फतेपूर जिल्ह्यात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पीएसआय दत्ता पेंडकर आणि सागर भास्कर हे आपल्या सहकाऱ्यांसह उत्तर प्रदेशातील फतेपूर जिल्ह्यातील ग्राम चक्की मलवाव येथे पोहचले. तेथून पोलिसांनी आरोपी अभिजित पांडे आणि त्याच्या अल्पवयीन साळ्याला ताब्यात घेतले. या दोघांकडून चार लाखांचे मोबाईल तसेच चोरीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.चोरी आणि पळून जाण्याचे तंत्रआरोपी अभिजित पांडे हा अत्यंत धूर्त चोरटा आहे. तो सुशिक्षित असून त्याला सीसीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनबाबतही माहिती आहे. पोलीस या आधारेच गुन्ह्याचा छडा लावतात, हे माहिती असल्याने पांडे सर्वप्रथम अंधाºया गल्लीबोळातून जाऊन सीसीटीव्हीच्या डीव्हीआरची वायर तोडायचा. तत्पूर्वी दिवसा वाहन चालवताना कुठे चोरी करायची, ते ठरवायचा आणि रात्री आपल्या १७ वर्षीय साळ्याला घेऊन चोरी-घरफोडी करायचा. त्याने साळ्यालाही झटपट चोरी, घरफोडी कशी करायची, त्याचे तंत्र शिकविले होते. पोलिसांनाच नव्हे तर पोलिसांच्या श्वानाला कसा गुंगारा द्यायचा, त्याबाबतही त्याने साळ्याला टीप्स दिल्या होत्या. श्वानाला संभ्रमित करण्यासाठी चोरीच्या ठिकाणापासून काही अंतरावर तो नुसता गोल गोल फिरत होता. चोरी केल्यानंतर तो रेसर बाईक पळवावी त्या वेगाने एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पळून जात होता. मात्र, आम्ही त्याच्यावर मात करून त्याला अटक करण्यात यश मिळवल्याचेही उपायुक्त रौशन यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिसांनी पांडे आणि त्याच्या मेव्हण्याकडून नंदनवन, हुडकेश्वर आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या सहा गुन्ह्यांचा छडा लावल्याचेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशातील चोरट्यांची जोडगोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:12 PM
मोबाईल शॉपी फोडून लाखोंचे मोबाईल्स चोरणाऱ्या एका सराईत जोडगोळीला नंदनवन पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन जेरबंद केले. यातील मुख्य आरोपीचे नाव अभिजित ऊर्फ अपजित सोमनाथ पांडे (वय २९) आहे. तो राजनगर वाठोडा येथे भाड्याच्या खोलीत राहतो. त्याच्यासोबत त्याचा साळाही आरोपी आहे. मात्र, तो अल्पवयीन आहे. साळ्या-भाटव्याच्या या जोडगोळीकडून लाखोंचे मोबाईल्स जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
ठळक मुद्देएका महिन्यात सहा चोऱ्यापाच लाखांचा ऐवज जप्तनागपूरच्या नंदनवन पोलिसांची कारवाई