शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता'

By नरेश डोंगरे | Published: November 24, 2023 6:16 PM

सकाळी ६ पासून सुरिवात : ६ तासांची भट्टी, रोजच्या रोज होतो जेवणात बदल 

नरेश डोंगरेनागपूर : शहर असो अथवा गावातील रहिवासी. अपवाद वगळता बहुतांश जणांकडे सकाळचा चहाही तयार व्हायचा असतो. ‘त्या’ वसाहतीत मात्र भल्या सकाळीच किचन सुरू होते. सुमारे अडीच हजार जणांना सकाळी १० ते ११ या वेळेत जेवण द्यायचे असल्यामुळे भल्या सकाळपासूनच भात, पोळ्या, वरण-भाजीच्या तयारीची लगबग सुरू होते. सकाळीच भट्टी लावली जाते अन् सुमारे ५० जणांच्या परिश्रमातून ‘त्या’ सर्वांच्या ‘क्षुधा तृप्ती’ची सुविधा तयार केली जाते. हिवाळा असो, पावसाळा असो की उन्हाळा. वर्षातील १२ महिने आणि ३६५ दिवस हा नित्यक्रम अखंडितपणे सुरू असते. सण-वार असो की आणखी कोणताही दिवस त्या वसाहतीतील अर्थात कारागृहातील किचन आणि भत्त्याला सुटी नसतेच.

ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी १८६४ साली नागपूरला मध्यवर्ती कारागृह तयार केले. या कारागृहाची सध्याची बंदीवानांची क्षमता १९०० कैद्यांची असली तरी येथे रोज सुमारे अडीच हजार कैदी बंदिस्त असतात. कधी कधी ही संख्या २७०० ते २८०० पर्यंत जाते. नव्या गुन्ह्यातील कैद्यांना आतमध्ये डांबणे आणि जामीन झालेल्यांना येथून मुक्त करणे, ही रोजचीच प्रक्रिया. तरीसुद्धा सुमारे २५०० कैदी येथे मुक्कामी असतातच. त्यांना सकाळी ७ वाजता चहा नाश्ता दिला जातो. त्यानंतर सकाळी १० ते ११.३० पर्यंत सर्वांना जेवण दिले जाते. परत रात्रीचे जेवण त्यांना ७ च्या आतमध्येच देण्याचे प्रयोजन आहे. कारण रात्री ७ नंतर सर्व कैद्यांना बराकीत बंद करायचे असते. त्यामुळे सकाळचे जेवण आटोपताच तास-दोन तासांनंतर सायंकाळच्या जेवणाचीही भट्टी येथे सुरू केली जाते.

सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेच्या जेवणाऱ्यांची संख्या रोज किमान पाच हजार जणांची असते. त्यांच्यासाठी दोन्ही वेळेला भातपोळ्या तर असतातच वरण किंवा भाजी वेगवेगळी तयार केली जाते. कधी डाळभाजी, कधी आलूवांगे, कधी काही तर कधी काही, असा हा रोजचा मेणू असतो. त्याला ‘भत्ता’ म्हटले जाते.

असा तयार होतो दोन वेळेचा भत्ता

गहू (पीठ) - १००० किलोतांदूळ (भात) - २५० ते ३०० किलोडाळ - १०० किलो

तेल, मसाल्याची लिस्ट वेगळी 

पोळी, भात आणि डाळीचे ठिक आहे. डाळ आणि भाज्या बनविण्यासाठी लागणारे टोमॅटो, मिरची सांबार (सर्व एकत्र) पालेभाज्या भाज्या सुमारे २०० किलो लागतात. मात्र, तेल, मीठ, मिरची, मसाले आणि ईतर पदार्थ नेमके किती लागतात, ते संबंधितांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरे म्हणजे, उपरोक्त आकडेवारी जवळपास ५ हजार कैद्यांच्या जेवणाची आहे. त्यात रोज कैद्यांच्या संख्येनुसार बदल होतो. 

टॅग्स :foodअन्नjailतुरुंगPrisonतुरुंगnagpurनागपूर