शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची दोन हजाराकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 10:54 PM

रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे४९ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू : रुग्णसंख्या १९१४ : मृतांची संख्या ३० : कामठीत १३ रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. बुधवारी यात ४९ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १९१४ वर पोहचली. यात तीन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३० झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यवर्ती कारागृहात रॅपिड चाचणीमुळे २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर कामठीत १३ रुग्णांची नोंद झाली.जून महिन्यात आठ दिवसात पाच मृत्यूची नोंद झाली. आज नोंद झालेल्या तीन मृतांमध्ये दोन मेयो तर एक मेडिकलचा रुग्ण होता. मध्य प्रदेशातील सिवनी येथील ६८ वर्षीय रुग्णाचा मेयोमध्ये उपचार सुरू असताना मध्यरात्री मृत्यू झाला. या रुग्णाला टाईप टू मधुमेह व इतरही आजार होते. दुसरा रुग्ण हा ७१ वर्षीय अमरावती येथील राहणारा होता. या रुग्णालाही टाईप टू मधुमेह, उच्चरक्तदाब व इतरही आजार होते. मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना या रुग्णाचा आज मृत्यू झाला. तर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला धरमपेठ येथील ७३ वर्षीय रुग्णाचे नमुने खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. या रुग्णाला श्वसनाचा गंभीर आजार होता. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना आज दुपारी मृत्यू झाला.कारागृहातील पुन्हा २१ पॉझिटिव्हमध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी व आता बंदिवान मोठ्या संख्येत पॉझिटिव्ह येत आहेत. आज पुन्हा २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात काही बंदिवान असल्याचे सांगण्यात येते. कारागृहात आतापर्यंत १४७ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वच बंदिवानाची रॅपिड अ­ॅण्टीजेन चाचणी होणार असल्याने लवकरच कारागृहात किती रुग्ण आहेत ते सामोर येण्याची शक्यता आहे.शहरात या भागात आढळून आले रुग्णएम्सच्या प्रयोगशाळेत १०, मेयोच्या प्रयोगशाळेत आठ, नीरीच्या प्रयोगशाळेत चार तर खासगी लॅबमधून सहा व कारागृहातून २१ असे ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण सोमवारीपेठ, मिनीमातानगर, भगवाघर चौक, कोराडी रोड, जाफरनगर, सुभेदार ले-आऊट, जुनी मंगळवारी, काटोल रोड, राजनगर व हिंगणा रोड या भागातील आहेत. याशिवाय मेयो रुग्णालयातून ११ तर मेडिकलमधून चार असे १५ रुग्णांंना सुटी देण्यात आली. आतापर्यंत १४०० रुग्ण बरे झाले आहेत.ग्रामीण भागात रुग्णांची संख्या २८२शहरासोबतच ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. विशेषत: कामठी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कामठी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २० वर पोहोचली आहे. महानिर्मितीच्या कोराडी वीज वसाहतीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वीज केंद्रात कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याची नातेवाईक असलेली तरुणी दोन दिवसापूर्वी हैदराबाद येथून वीज वसाहतीत आली होती. मंगळवारी रात्री तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ग्रामपंचायत दवलामेटी अंतर्गत येणाऱ्या हिलटॉप कॉलनीमधील ३२ वर्षीय तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही तरुणी मध्यवर्ती कारागृहात संगणक कर्मचारी म्हणून काम करते.संशयित : १९८८अहवाल प्राप्त : २८०५३बाधित रुग्ण : १९१४घरी सोडलेले : १४००मृत्यू : ३०

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर