नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने अमरावती मार्गावरील वडधामना येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना अटक करून त्यांच्याकडून २२ हजाराची १४ ई-तिकिटे जप्त केली आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाने ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन तिकीट दलालांवर कारवाई केली आहे. वडधामना येथील ए. बी. ऑनलाईन या दुकानावर धाड टाकली असता अमित ब्रह्मे (३०) ई-तिकिटांचा काळाबाजार करताना आढळला. त्याच्याकडून १५ हजार रुपयांचे ७ ई तिकिट जप्त करण्यात आले आहेत. तर याच दुकानासमोर एका स्टेशनरीच्या दुकानात गणेश विठ्ठल राव हा सुद्धा ई-तिकिटांंचा काळाबाजार करताना आढळला. त्याच्याकडून ६५०० रुपये किमतीची ७ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास कुमार, उषा बिसेन यांनी पार पाडली.