कळमेश्वर : भरधाव टिप्परचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचभवन शिवारात बुधवारी (दि.२३) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
आनंद माेरेश्वर कांबळे (२२, रा. खैरी पन्नासे, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. मृत आनंद हा आपल्या एमएच-४०/जी-९८२६ क्रमांकाच्या दुचाकीने चिचभवन शिवारातील जाॅनडियर कंपनीमध्ये कामाला जात हाेता. दरम्यान, चिचभवन शिवारातील पंचभाई यांच्या शेताजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-४०/बीजी-६०२९ क्रमांकाच्या भरधाव टिप्पर चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने आनंदचा मृत्यू झाला. याप्रकरणी माेरेश्वर रामकृष्णाजी कांबळे (४८, रा. खैरी पन्नासे, ता. हिंगणा) यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी आराेपी टिप्परचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक मेश्राम करीत आहेत.