लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : भरधाव अज्ञात वाहनाने माेरसायकलला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर- माेहपा मार्गावरील घाेराड शिवारात शनिवारी (दि. २०) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
रत्नाकर यशवंतराव गोतमारे (५४, रा. वाढाेणा खुर्द, ता. कळमेश्वर) असे मृत दुचाकीचालकाचे नाव आहे. रत्नाकर हे कळमेश्वर एमआयडीसी परिसरातील खासगी कंपनीमध्ये नाेकरी करायचे. ते शनिवारी काम आटाेपल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांच्या एमएच-३१/एएन-९९७० क्रमांकाच्या माेटरसायकलने कळमेश्वरहून वाढाेणा (खुर्द) येथे घरी जात हाेते. दरम्यान, कळमेश्वर-माेहपा मार्गावरील घाेराड शिवारात वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला धडक देत काही दूर फरफटत नेले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या माेटरसायकलला बाेलेराेने धक्का देत काही दूर फरफटत नेल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. दुसरीकडे, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकास तातडीने अटक करून त्याच्यावर याेग्य व कठाेर कारवाई करण्याची मागणी मृत रत्नाकर गाेतमारे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.