लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नलवर उभे असलेल्या दुचाकीस्वार पिता-पुत्रीला महापालिकेच्या वाहनाने जोरदार धडक मारली. अपघातात पितापूत्री जखमी झाल्याचे पाहून संतप्त झालेल्या जमावाने हलगर्जीपणे वाहन चालविणा-याला खाली खेचून त्याची बेदम धुलाई केली. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास अशोक चौकात हा अपघात घडला. अपघाताने तणाव निर्माण झाला असताना पोलीस विलंबाने पोहचल्यामुळे तणावात जास्तच भर पडली.रमेश गणपतराव पराते (वय ५८) आणि त्यांची मुलगी ममता (वय २३) अशी जखमींची नावे आहे. ते जुनी शुक्रवारी परिसरात राहतात. रमेश पराते निवृत्त रेल्वे कर्मचारी असून, ममता शिवाजी सायन्स कॉलेजला शिकते. ममताचे शैक्षणीक कागदपत्र मिळवण्यासाठी रमेश पराते आणि ममता शिवाजी सायन्समध्ये गेले होते. दुपारी १.३० च्या सुमारास परत येत असताना अशोक चौकातील सिग्नल बंद असल्याने त्यांनी दुचाकी थांबवली. बाजुलाच महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे वाहन (एमएच १२/ सीक्यू ४७५३) उभे होते. सिग्नल सुरु होताच निष्काळजीपणे वाहन चालवून महापालिकेच्या वाहनचालकाने पराते पितापुत्रीच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. ममताचा पाय जायबंदी झाला. महापालिकेच्या वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याने जमाव संतप्त झाला. जमावाने वाहनचालकाला खाली खेचून बेदम मारहाण केली. अपघाताने तणाव निर्माण केला असताना बराच वेळपर्यंत पोलीस तेथे पोहचलेच नाही. त्यामुळे तणावात भर पडला. विशेष म्हणजे, वृत्तलिहिस्तोवर पोलिसांकडून आरोपी वाहनचालकाचे नाव कळू शकले नाही.
नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पितापूत्र गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:06 AM
सिग्नलवर उभे असलेल्या दुचाकीस्वार पिता-पुत्रीला महापालिकेच्या वाहनाने जोरदार धडक मारली. अपघातात पितापूत्री जखमी झाल्याचे पाहून संतप्त झालेल्या जमावाने हलगर्जीपणे वाहन चालविणा-याला खाली खेचून त्याची बेदम धुलाई केली. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास अशोक चौकात हा अपघात घडला. अपघाताने तणाव निर्माण झाला असताना पोलीस विलंबाने पोहचल्यामुळे तणावात जास्तच भर पडली.
ठळक मुद्देवाहनचालकाची जमावाकडून धुलाई : पोलिसांनी विलंब केल्यामुळे तणावात भर