शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

दारू तस्करी करणाºया दोन महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:36 AM

दारुबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने दोन महिलांना रंगेहाथ पकडून.....

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची रेल्वेस्थानकावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारुबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने दोन महिलांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून १३४४० रुपये किमतीच्या दारूच्या १०८ बॉटल जप्त केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचा जवान जसवीर सिंह यास रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेली सूचना त्याने आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, जसवीर सिंह, उषा तिग्गा यांची चमू गठित केली. चमूने रेल्वेस्थानकावर गस्त घातली असता सकाळी ११.४० वाजता संत्रा मार्केटकडील पुलाजवळ एक महिला संशयास्पद स्थितीत आढळली. तिने आपले नाव रोशनी महेश गुजर (३०) रा चंद्रपूर असे सांगितले. तिच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १९२० रुपये किमतीच्या १२ बॉटल होत्या. दुसºया घटनेत दुपारी १.१० वाजता संत्रा मार्केटकडील गेटजवळ एक महिला संशयास्पद अवस्थेत आढळली. तिने आपले नाव शिल्पा अशोक यादव (२३) सांगितले. तिच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ११५२० रुपये किमतीच्या ९६ बॉटल आढळल्या. जप्त करण्यात आलेली दारू आणि महिलांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.