लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्क्रब टायफसचा संक्रमित अविकसित कीटक चावल्यामुळे होणाऱ्या या रोगाने पुन्हा दोन रुग्णांचे बळी घेतले आहे. मृत्यूचा आकडा आता १४ वर गेला असून रुग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३७ रुग्णांची नोंद झाली आहे.चित्रलेखा शाहू (३७) रा. कळमना नागपूर तर सीमा भलावी (२६) रा. सिवनी, मध्य प्रदेश असे मृताचे नाव आहे. ‘चिगर माईट्स’ कीटकामुळे होणाºया स्क्रब टायफसच्या निदानासाठी व तत्काळ उपचारासाठी आरोग्य विभागासह, मेडिकल, मेयो रुग्णालयांनी कंबर कसली असलीतरी मृत्यूची संख्या वाढतच आहे. शहर आणि शहरालगत परिसरात हा आजार मोठ्या संख्येत फोफावत आहे. गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेयोमध्ये १४ रुग्णइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेयो) आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले असून पहिल्यांदाच दोन महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यातील चित्रलेखा या महिलेला ३० आॅगस्ट रोजी तर सीमा हिला १० आॅगस्ट रोजी मेयोमध्ये भरती करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या मते, स्क्रब टायफससोबतच या दोन्ही महिलांना हृदयाचा गंभीर आजार होता.स्क्रब टायफसची स्थितीजिल्हा रुग्ण मृताची संख्यानागपूर २६ ०५शहर ११ ०३गोंदिया ०२ ००वर्धा ०५ ००गडचिरोली ०४ ००भंडारा ०४ ०१अकोला ०२ ०१अमरावती ०८ ००चंद्रपूर ०१ ००इतर राज्यमध्य प्रदेश १६ ०४आंध्र प्रदेश ०१ ००