प्रश्न : हे नवे व्हेरियंट काय आहेत?
- युनायटेड किंग्डममध्ये ज्या नव्या कोरोना विषाणूंच्या प्रकारांची (व्हेरियंट) ओळख पटविली गेली, त्याचे २३ वे हे परिवर्तित रूप (म्यूटेशन्स) आहे. यातील अनेक म्यूटेशन्स तर प्रोटीनच्या स्पाइक्समध्ये असतात. त्याचा उपयोग माणसाच्या कोशिकांसोबत जुळण्यासाठी केला जातो. हे व्हेरियंट दुसऱ्या व्हेरियंटच्या तुलनेत मृत्यूसाठी अधिक कारणीभूत ठरू शकतात. या व्हेरियंटला ‘बी.१.१.७’ या नावाने ओळखले जाते. या प्रकरणात संशोधनाची गरज आहे.
प्रश्न : दक्षिण आफ्रिकेत कोणत्या प्रकारचा व्हेरियंट आढळला?
- या व्हेरियंटच्या प्रोटीन स्पाइक्सवर अनेक प्रकारचे म्यूटेशन्स असतात. मात्र हे व्हेरियंट अन्यच्या तुलनेत आजाराचे रूप अधिक गंभीर करतात का, याला अद्याप आधार नाही. या व्हेरियंटला ‘बी.१.३५१’ या नावाने ओळखले जाते.
प्रश्न : ब्राझीलमधील व्हेरियंट कसा आहे?
- या व्हेरियंटचे १७ म्यूटेशन्स आहेत. यातील तीन एस प्रोटीनमध्ये आहेत. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, हे व्हेरियंट कोविड-१९ चे संक्रमण प्रतिबंधात्मक लसीमुळे कमी प्रभावित होतात. बरेचदा, म्यूटेशनचा संबंध कोविड व्हायरस संक्रमणाच्या नव्या लक्षणांमुळे होऊ शकतो.
प्रश्न : काय आहेत मुख्य लक्षणे?
- ताप, सर्दी, गळ्यात दुखणे या सारखी काही लक्षणे रुग्णांमध्ये आढळतात. तर काहींमध्ये उलटी होणे, डायरिया अशा तक्रारीही दिसू शकतात. वास आण चव जाण्याचे लक्षण ३० टक्के रुग्णांमध्ये पाहण्यात आले आहे. काही रुग्णांमध्ये वास आणि चवींमध्ये घडणारा बदल ६० दिवसांपर्यंत राहतो.
प्रश्न : म्यूटेंट व्हायरसमुळे त्वचेत बदल दिसतो का?
- होय. त्वचेवर लाल रंगाचे चट्टे, त्यावर लाल रंगाचे फोड येणे, त्वचा रंगहीन किंवा फिक्कट दिसणे, फोड येणे, खाज सुटणे, पस येणे अशी लक्षणे दिसतात.
प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांमध्ये काय लक्षणे दिसतात?
- ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतिभ्रम होण्यासारखी लक्षणे दिसतात. हे फार धोकादायक असते. डोळे लाल होणे, तसेच कंजेक्टिव्हायटिसचादेखील कोविड संक्रमणासोबत संबंध असू शकतो.
प्रश्न : नव्या व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे?
- नव्या व्हेरियंटवरील उपचाराच्या प्रतीक्षेत सध्या उपलब्ध असलेली लस घेणे टाळू नये. ही लस नव्या व्हेरियंटवर मात करण्यात कमी सक्षम असली तरी आपल्याकडे असलेल्या बचावात्मक कवचाचा उपयोग करायला हवा.
प्रश्न : व्हायरसचे म्यूटेशन कसे कमी होणार?
- दुसऱ्यांदा पलटून येत नाही, तोपर्यंत व्हायरस म्यूटेशन पार करू शकत नाही. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याचे पालन करायला हवे. लस घ्यायला हवी.
प्रश्न : सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आणि पहिल्या लाटेत काय फरक आहे?
- या वेळी संक्रमण वेगाने वाढत आहे. एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्ती संक्रमित होत आहेत. या वेळी फुप्फुसांवर अधिक परिणाम दिसत आहे. अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मेंदू, हृदय आणि किडनीमध्ये रक्त गोठणे अधिक धोकादायक ठरत आहे. तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या ॲंटी व्हायरल ड्रग्सचा प्रभाव कमी दिसत आहे.
प्रश्न : आरोग्यसेवा देणाऱ्या यंत्रणेने या दुसऱ्या लाटेत करावे?
- मास्किंग, सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित होत धुणे यावर अधिक भर द्यावा. लसीकरणाचा वेग वाढवावा. खरे तर घरोघरी जाऊन व्हॅक्सिनेशन करण्याची वेळ आता आली आहे.
प्रश्न : कोरोनाचे नवे व्हेरियंट पुन्हा पुन्हा येत राहतील का?
- होय. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येत संक्रमण होतपर्यंत हे होतच राहणार. दर आठवड्यात नवा व्हेरियंट आढळत आहे. संक्रमणाचा पॅटर्न बदलल्यावर हा बदल व्हायरसमुळे की माणसाच्या बदलत्या व्यवहारामुळे हे सांगणे कठीण होईल. वेगवेगळ्या महाद्वीपांवर स्पाइक प्रोटीनमध्येसुद्धा बदल झालेला दिसत आहे, ही धोक्याची घंटा आहे.