शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

तिमिरातून तेजाकडे जाणारे ‘उदय’

By admin | Published: February 20, 2017 2:25 AM

नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला.

वेदप्रकाश मिश्रा : ‘तिमिरातून उदयाकडे’ पुस्तकाचे प्रकाशननागपूर : नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला. दुर्दम्य आशावाद, अतूट धैर्य आणि प्रचंड इच्छाशक्तीमुळेच हे शक्य होऊ शकले. प्राणांतिक वेदनाही त्यांनी हसत हसत सहन केल्या. त्यांच्या पुढे मृत्यूही हरला. तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या या प्रवासाचे वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकातून केले, हे पुस्तक प्रत्येकाला जगण्याची उमेद देणारे ठरेल, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. डॉ. उदय बोधनकर यांच्या ‘तिमिरातून उदयाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध लेखिका सुप्रिया अय्यर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय माहोरकर, डॉ. विकास बिसने, डॉ. अनुप मरार उपस्थित होते. त्यांच्या या पुस्तकाला आत्मचरित्र न म्हणता, एक आत्मकथन किंवा आत्मचिंतन म्हणणे योग्य ठरेल, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. सुप्रिया अय्यर म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र नाही किंवा ती कादंबरी नाही. हे एक तीव्र संवेदनाचा लेखाजोखा आहे. या सबंध लेखन प्रवासात डॉ. बोधनकर हे जगण्यावर अन् त्यासोबतच यशस्वी होण्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे दिसून आले. मृत्यूला स्पर्श करून आल्यावरही ते तेवढ्याच ताकदीने उभे आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे. डॉ. बोधनकर म्हणाले, प्रत्यक्ष मृत्यूलाही परतवून लावण्याचं बळ मला देणाऱ्या अनेक आप्तेष्टांचे, मित्रांचे व अनेक डॉक्टर मित्रांचे हे पुस्तक आहे. एका साध्या चुकीतून जीवनाची बिघडलेली लय, या चुकीचे दशावतार दाखविताना नियतीने कुठलीच न सोडलेली कसर, मित्रांचे व आप्तांचे प्रयत्न, याचा हा लेखाजोखा आहे. मृत्यूचे दार अनेकदा ठोठावूनही माझा जणू पुनर्जन्म झाल्याचा हा प्रवास आहे. यावेळी डॉ. माहोरकर यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बोधनकर यांना वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रवास उलगडला. डॉ. अविनाश गावंडे यांनी रुग्णालयातील त्या तीन महिन्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांचे प्रसंग उभे केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. संजय जयस्वाल, डॉ. एस. डब्ल्यू चोरघडे, डॉ. आर. के. खेमका, डॉ. मदन वराडे, डॉ. सी. एम. बोकडेआदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)