लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ’धूरमुक्त- गॅसयुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम येत्या १४ जुलैपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बीपीएल, अंत्योदय या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतच केरोसीनचा वापर करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरातील सर्व कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. या अभियांनातर्गत जिल्ह्यातील सुमारे १ लाख १० हजार कुटुंबांना थेट लाभ होणार असून ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.बचत भवन सभागृहात ‘धूरमुक्त- गॅसयुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग, जिल्ह्यातील गॅस एजन्सीचे मालक, व्यवस्थापक तसेच एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल या कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही, अशा सर्व कुटुंबांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले की, ग्रामीण भागात ४५ हजार कुटुंब व शहर भागात ५६ हजार कुटुंब केरोसीनचा वापर करतात. या सर्व कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. यासाठी गॅस एजन्सी व अन्नधान्य वितरण विभागातर्फे गॅस कनेक्शन मिळण्यासाठी अशा कुटुंबांकडे विहीत नमुन्यात अर्ज भरून येत्या सात दिवसांत संबंधित कुटुंबांना गॅस योजनेचा लाभ मिळेल यादृष्टीने गॅस एजन्सीच्या मालकाने नियोजन करावे, असे निर्देशनही यावेळी दिले.रेशनकार्ड नसलेल्यांनाही लाभ जिल्ह्यातील रेशनकार्ड नसलेले, गॅस नसलेले कुटुंब तसेच धान्य मिळत नसलेले कुटुंब यांची यादी तयार करण्यात येत असून अशा कुटुंबांना या मोहिमेत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. त्यांच्याकडूनही फॉर्म भरून घ्यावा. त्यासाठी अन्नधान्य विभाग व संबंधित गॅस एजन्सीमार्फत विशेष शिबिर घेण्यात येईल, असे निर्देशही देण्यात आले.अन्नसुरक्षेत २४ लाख लोकांना लाभअन्नसुरक्षा योजनेचा जिल्ह्यातील २४ लाख लोकांना लाभ मिळत असून यांतर्गत १ लाख १३ हजार अंत्योदय व अन्य योजनांची कार्डधारक आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान याच कालावधीत राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे आणि ‘धूरमुक्त-गॅसयुक्त महाराष्ट्र’ यांतर्गत सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन देणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.
एक लाखावर कुटुंबांना ‘उज्ज्वला’ गॅस जोडणी : अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:17 AM
’धूरमुक्त- गॅसयुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम येत्या १४ जुलैपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बीपीएल, अंत्योदय या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतच केरोसीनचा वापर करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरातील सर्व कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. या अभियांनातर्गत जिल्ह्यातील सुमारे १ लाख १० हजार कुटुंबांना थेट लाभ होणार असून ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
ठळक मुद्देकेरोसीनऐवजी प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी