कलर्स प्रस्तुत महाकालीचे महामंचचा उपक्रम : लोकमतच्या वाचकांसाठी स्पर्धा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा-आई जगदंबा असो की माँ महाकाली असो तिच्या विविध रूपातून अलौकिक शक्तीचे दर्शन भक्तांना घडते. भक्तही आपल्या भक्तीद्वारे तिला प्रसन्न करीत असतो. याच कलेला घेऊन कलर्स प्रस्तुत व महाकालीचे मंचच्यावतीने ‘अंत ही आरंभ है’ या एकल नृत्य व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ही स्पर्धा बुधवार १९ जुलै रोजी रामगोपाल माहेश्वरी भवन येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. ही स्पर्धा सर्व लोकमत वाचकांसाठी खुली आहे. दहा वर्षांवरील स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. नृत्य सादर करण्याचा कालावधी ५ मिनिटांचा असणार आहे. त्यात सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे. विशेषत: हुंडाबळी, बेटी बचाओ, महिला सशक्तीकरण, स्त्री अत्याचार आदींचा समावेश असावा. प्राथमिक फेरी मंगळवार १८ जुलै रोजी लोकमत भवन ११ वा मजला, बी विंग येथे दुपारी ३ वाजता घेण्यात येईल. यानिमित्ताने महाकालीचे महामंचद्वारे कलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणार आहे. असे म्हणतात की आपल्या अक्राळविक्राळ शक्तीने महाकाली ओळखल्या जातात. पण संहारक म्हणून महाकाली पूज्य आहे. अशा या महाकालीचे दर्शन तिची महिमा सांगणारी कलर्सची येणारी मालिका म्हणजे महाकाली, ‘अंत ही आरंभ है’. ही मालिका २२ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. प्रत्येक शनिवार व रविवारी सायंकाळी ७ वाजता कलर्स चॅनलवर दिसणार आहे.या मालिकेद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न कलर्स चॅनलद्वारे करण्यात आला आहे. स्त्री ही वात्सल्यमूर्ती आहे. पण प्रसंगी ती महाकालीचे रूप धारण करून दुष्टांचा संहार करते. नाजूक कोमल हृदयाची स्वामिनी रणचंडिका होऊन संहारक बनते तेव्हा तिच्यातील शक्तीचा बोध घेणे या मालिकेचा उद्देश आहे आणि म्हणूनच अशा नृत्य स्पर्धेतून हा संदेश देण्याचा प्रयत्न असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्व वाचक वर्ग कार्यक्रम बघण्याकरिता सादर आमंत्रित आहे. स्पर्धादेखील नि:शुल्क आहे. मात्र, स्पर्धेची नोंदणी कार्यालयात येऊन करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - नेहा जोशी- ९८५०३०४०३७ किंवा ९९२२९६३५२६ यावर संपर्क साधावा.
‘अंत ही आरंभ है’ स्पर्धा उद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:00 AM