शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

अखेर वादग्रस्त शेलोटची बदली

By admin | Published: October 18, 2015 3:15 AM

अनेक प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या जयंता शेलोट या पोलीस शिपायाची अखेर कोतवाली ठाण्यात...

नागपूर : अनेक प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या जयंता शेलोट या पोलीस शिपायाची अखेर कोतवाली ठाण्यात बदली करून त्याला परिमंडळ तीनच्या उपायुक्त कार्यालयात संलग्नित करण्यात आले.आधी खंडणीचा गुन्हा, नंतर अटक, पीसीआर, निलंबन आणि पुन्हा सेवेत रुजू झालेल्या जयंताची सहा महिन्यांपूर्वी अचानक गुन्हेशाखेत वर्णी लागल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्याच्या नियुक्तीपासूनच आरोपाच्या फैरी झडल्या. या पार्श्वभूमीवर, अनेक ठिकाणी गुन्हेशाखेने कारवाया केल्या आणि त्यातील अनेक कारवायात जयंता शेलोट वादग्रस्त झाला. हॉटेल मालकावर कारवाई करून त्याला देशी कट्टा प्रकरणात आरोपी बनविण्यासोबतच त्याच्याकडून दोन लाखांची मागणी केल्याचे प्रकरण सर्वत्र गाजले. चौकशी सुरू असतानाच एका बुकीच्या अड्ड्यावर धाड घालण्यासाठी एका गुन्हेगाराचे वाहन वापरल्याचे वृत्त पुढे आल्याने गुन्हेशाखेचीच मान शरमेने खाली गेली. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रारी झाल्या. स्थानिक अधिकारी जयंताची पाठराखण करीत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जयंताची गुन्हेशाखेतून उचलबांगडी करून त्याला कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आले.(प्रतिनिधी)