लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या पॅगोडावर बसवण्यासाठी म्यानमार (ब्रह्मदेश) येथून छत्री आली आहे. म्यानमारमध्ये पॅगोडावर विशिष्ट प्रकारची छत्री बसवण्याची परंपरा आहे. त्यामुळे याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. गुुरुपौर्णिमेच्या दिवशी भिक्खू संघाच्या उपस्थितीत ही छत्री स्थापित करण्यात येणार आहे.कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरातच भव्य विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. दहा महिन्यांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या मेडिटेशन सेंटरच्यावर चार छोटे पॅगोडे बनवण्यात आले असून त्यांची उंची ५० फूट आहे तर मध्यभागी एक मोठा ८० फूट उंचीचा पॅगोडा बनवण्यात आला असून त्यावर उत्कृष्टरीत्या नक्षीकाम केलेले आहे. म्यानमारमध्ये पॅगोडावर एका विशिष्ट पद्धतीची छत्री बसवण्याची एक परंपरा आहे. गुरुपौर्णिमेला भदंत महापंत व या सेंटरच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे यांच्या उपस्थितीत या छत्रीची स्थापना करण्यात येणार आहे.
ड्रॅगन पॅलेसच्या पॅगोडासाठी म्यानमारहून आली छत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 8:15 PM
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या पॅगोडावर बसवण्यासाठी म्यानमार (ब्रह्मदेश) येथून छत्री आली आहे. म्यानमारमध्ये पॅगोडावर विशिष्ट प्रकारची छत्री बसवण्याची परंपरा आहे. त्यामुळे याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. गुुरुपौर्णिमेच्या दिवशी भिक्खू संघाच्या उपस्थितीत ही छत्री स्थापित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देगुरुपौर्णिमेला स्थापना