कन्हान (ता. पारशिवनी) येथेही शनिवारी १७ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. येथे एकूण १२४ जणांची चाचणी करण्यात आली हाेती. यातील १७ जण काेराेना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. आजवर कन्हान परिसरात काेराेनाचे एकूण १,१८२ रुग्ण आढळले असून, यातील ९६८ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत तर ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या १८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. याेगेश चाैधरी यांनी दिली. कुही तालुक्यात शनिवारी १३ नवीन रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ८५६ झाली आहे. तालुक्यातील कुही येथील ग्रामीण रुग्णालय तसेच मांढळ, वेलतूर, साळवा व तितूर प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत १६५ नागरिकांची चाचणी करण्यात आली हाेती. त्यात १३ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. या नवीन रुग्णांमध्ये सिल्ली येथील पाच, आकोली येथील तीन, मांढळ येथील दाेन व वेलतूर येथील तीन रुग्ण आहेत.
उमरेड, कन्हानमध्येही काेराेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:09 AM