शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

Umred Election Results : पारवे हरले, पारवे जिंकले! काँग्रेसने बालेकिल्ला मिळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:02 PM

Umred Election Results 2019 : Sudhir Parwe Vs Raju Parwe

ठळक मुद्देउमरेडमध्ये भाजपला धक्का

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : (उमरेड/भिवापूर) : पारवे विरुद्ध पारवे अशी लढाई असलेल्या उमरेड मतदार संघात काँग्रेसचे राजू पारवे १८ हजार २९ मतांनी विजयी झाले. येथे भाजपचे सुधीर पारवे यांचा धक्कादायक पराभव झाला. राजू पारवे यांना ९१,९६८ तर सुधीर पारवे यांना ७३,९३९ मते मिळाली.गत दोन निवडणुकात ५० हजार मतांची आघाडी मिळविणाऱ्या सुधीर पारवे यांना यावेळी ७३,९३९ मतावर समाधान मानावे लागले. गतवेळी दुसरा क्रमांक गाठणाऱ्या बसपाच्या हत्तीला येथे फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. बसपाचे संदीप मेश्राम यांना १८ हजार ५६७ मते मिळाली. यावेळी बसपा सोडून वंचित बहुजन आघाडीचा आधार घेणारे रुक्षदास बंसोड ५,९३१ मतावरच थांबले.सलग दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलल्यानंतर आता मात्र तिसऱ्यांदा काँग्रेसने सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराला चारीमुंड्या चित केले. आधीच लेटलतीफ सुरू झालेल्या मतमोजणीचे काम शेवटपर्यंत अतिशय संथगतीने चालले. सोबतच सात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने अखेरीस व्हीव्हीपॅट मोजणीचा निर्णय घेण्यात आला. व्हीव्हीपॅटची ही मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सात ईव्हीएम वगळता मतमोजणीच्या २८ फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांना पोस्टल मतासंह ९१,९६८ मिळाली. भाजपाचे पराभूत उमेदवार सुधीर पारवे यांना ७३,९३९ मते मिळाली. सुरुवातीच्या कलात सुधीर पारवे यांनी आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या मधल्या फेरीत काँग्रेस-भाजपात अटीतटीची टक्कर दिसून आली. मात्र २० व्या फेरीनंतर काँग्रेसचे राजू पारवे यांचा विजय निश्चित होत गेला.गल्लीबोळात दिवाळीराजू पारवे हे विजयाच्या समीप असल्याची वार्ता सर्वत्र पसरताच चौकाचौकात, गल्लीबोळात दिवाळीपूर्वीच फटाके फुटले. विजयावर शिक्कामोर्तब होत असल्याचे समजताच माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक विजयी उमेदवार राजू पारवे यांच्यासह मतमोजणी केंद्रस्थळी पोहचले. त्यानंतर लागलीच विजयी रॅली काढत गुलाल उधळला. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या मिरवणुकीत नागरिकांची गर्दी उसळली. फटाक्यांच्या आतषबाजीत वाजतगाजत काढण्यात आलेल्या या रॅलीत ‘वारे पंजा, आ गया पंजा’चा एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी पालिकेचे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सुरेश पौनीकर, यशराज मुळक, सूरज इटनकर, राजेश भेंडे, सुरेश चिचमलकर, जितू गिरडकर, बाळू इंगोले, केतन रेवतकर, रितेश राऊत, प्रकाश मोहोड, विशाल देशमुख, संदीप खानोरकर, नागोराव जीभकाटे, मनोज तितरमारे, महादेव जीभकाटे, विलास राघोर्ते, अरुण हटवार, चंदू पारवे, विठ्ठल राऊत, राजू गारघाटे, राजू राऊत, दिलीप गुप्ता, लव जनबंधू, राकेश नौकरकर, गुणवंता मांढरे यांच्यासह काँग्रेसचे शेकडो समर्थक उपस्थित होते.मतदारांनी मोठी आव्हानात्मक जबाबदारी राजू पारवे यांच्यावर सोपविली. देशात व राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना काँग्रेस व मित्रपक्षांनी कडवी झुंज दिली. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे होते. हा ऐतिहासिक विजय आम्ही जनताजनार्दनास समर्पित करतो. त्यांचा विश्वास नक्कीच सार्थक ठरेल, अशी ग्वाही देतो. या संपूर्ण लढाईत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा आणि मित्रपक्षांनीही खूप मेहनत घेतली.’’राजेंद्र मुळकमाजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी‘‘उमरेड विधानसभेतील मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जे प्रेम दिलं, ते मी विसरूच शकत नाही. खऱ्या अर्थाने आजपासूनच ‘आमदार’ म्हणून प्रवास सुरू झाला असला तरी ‘आपला माणूस’ म्हणूनच जबाबदारी सांभाळणार आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत. खऱ्या अर्थाने रस्त्याचे प्रश्न, आरोग्याच्या समस्या, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, बेरोजगारीचा प्रश्न याकडे प्रामुख्याने प्राधान्य राहील.राजू पारवेआमदार, उमरेड विधानसभा क्षेत्र‘‘दहा वर्षांपासून हे निर्वाचन क्षेत्र भाजपाकडे होते. राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. लोकांच्या सेवेसाठी, कामासाठी हा विजय मौलिक आहे.’’गंगाधर रेवतकरमाजी नगराध्यक्ष, नगर परिषद, उमरेड

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019umred-acउमरेडcongressकाँग्रेस