शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

फ्लाईंग क्लबमधील चारही विमाने उड्डाणास असक्षम : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:48 AM

सध्याच्या परिस्थितीत नागपूर फ्लाईंग  क्लबमधील चारही विमाने उड्डाण भरण्यास असक्षम असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. विभागीय आयुक्त फ्लाईंग  क्लबचे अध्यक्ष असून त्यांनी फ्लाईंग  क्लबच्या सद्यस्थितीसंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

ठळक मुद्देइंजिन बदलविण्याची प्रक्रिया सुरू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सध्याच्या परिस्थितीत नागपूर फ्लाईंग  क्लबमधील चारही विमाने उड्डाण भरण्यास असक्षम असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. विभागीय आयुक्त फ्लाईंग  क्लबचे अध्यक्ष असून त्यांनी फ्लाईंग  क्लबच्या सद्यस्थितीसंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, चारपैकी तीन विमानांमध्ये ‘सेसना-१५२’ मॉडेलचे इंजिन लागले होते. ते तिन्ही इंजिन आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अमेरिकेतील लायकमिंग कंपनीकडे पाठविण्यात आली आहेत. सुधारित इंजिन २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत मिळणार आहेत. तसेच, चौथ्या विमानात २०१७ मध्ये ‘सेसना-१७२’ इंजिन बसविण्यात आले होते. परंतु, या विमानाने गेल्या दोन वर्षापासून उड्डाण भरले नाही. त्यामुळे त्या इंजिनचीही तपासणी करणे गरजेचे आहे. ही चारही विमाने उड्डाणक्षम करण्यासाठी मेन्टेनन्स मॅनेजरला पाच महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांची चिफ फ्लाईंग  इन्स्ट्रक्टरपदी नियुक्ती करण्याचा वाद अद्याप संपला नाही. क्लबमधील विमाने उड्डाणक्षम होतपर्यंत त्यांच्या नियुक्तीची गरज नाही असे न्यायालयाला सांगण्यात आले आहे. फ्लाईंग  क्लब चांगल्या पद्धतीने संचालित करण्यासाठी चिफ फ्लाईट इन्ट्रक्टर, असिस्टंट फ्लाईट इन्ट्रक्टर, मेन्टेनन्स मॅनेजर, क्वॉलिटी मॅनेजर, कन्टीन्युइंग एयरवर्थिनेस मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, स्टोअर किपर, चार टेक्निशियन, चिफ ग्राऊंड इन्स्ट्रक्टर व ग्राऊंड इन्स्ट्रक्टर या कर्मचाऱ्यांची गरज असून सध्या चिफ फ्लाईट इन्ट्रक्टर, दोन टेक्निशियन, चिफ ग्राऊंड इन्स्ट्रक्टर व ग्राऊंड इन्स्ट्रक्टर ही पदे रिक्त आहेत. त्यातील दोन टेक्निशियनची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. तसेच, फ्लाईंग क्लबमधील विविध दुरुस्तीची कामे २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण केली जातील अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी दिली आहे.प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेतलेयासंदर्भात सुमेधा घटाटे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विभागीय आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील मुद्दे विचारात घेण्याकरिता प्रकरणावरील सुनावणी चार आठवडे तहकूब केली. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. श्रीनिवास देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय