लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धरमपेठ, मंगळवारी आणि नेहरूनगर झोन अंतर्गत कारवाई करीत एकूण ८४ अतिक्रमण हटविले.पहिल्या पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मानव सेवानगर परिसरातील दोन इमारतींसमोरील ताराचे कम्पाऊंड हटविले. पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद चव्हाण यांच्या घरासमोरील जाळीचे गेट हटवण्यात आले. यासोबतच डॉ. गांगुलीचे कम्पाऊंड, दत्ता डेकोरेशनचे मंडपचे साहित्य हटवण्यात आले. यानंतर आकारनगर येथे भाजीपाला व फळ विक्रेत्यांचे सहा अनधिकृत शेड तोडण्याची कारवाई केली.मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्या दुसऱ्या पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत मानकापूर चौक ते पागलखाना चौक, सदर येथील मंगळवारी बाजार ते रेल्वे स्टेशनपर्यंत कारवाई करीत ४७ अतिक्रमण हटविले. तिसऱ्या पथकाने नेहरूनगर झोन अंतर्गत भांडे प्लॉट ते सक्करदरा गार्डन, अयोध्यानगर ते दत्तात्रयनगर, गुरुदेवनगर चौक ते केडीके कॉलेज चौकपर्यंत फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या ३७ अतिक्रमणधारकांना हटविले. गुरुवारीसुद्धा आसीनगर झोन अंतर्गत कामठी रोड, इंदोरा चौकातील डॉ. आंबेडकर रुग्णलयासमोरील फर्निचरवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली.
नागपुरात अनधिकृत शेड तोडले, ८४ अतिक्रमण हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 1:02 AM
मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धरमपेठ, मंगळवारी आणि नेहरूनगर झोन अंतर्गत कारवाई करीत एकूण ८४ अतिक्रमण हटविले.
ठळक मुद्देमनपा अतिक्रमण पथकाची कारवाई