लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहे.गजानन नारायण चव्हाण (३५) असे आरोपीचे नाव असून तो वाई हातोला येथील रहिवासी आहे. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.आरोपीचे वडील नारायण व लहान भाऊ रमेश हेदेखील प्रकरणात आरोपी आहेत. नारायणला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. रमेश फरार आहे. मयताचे नाव श्यामराव चव्हाण होते. तो आरोपी नारायणचा लहान भाऊ होता. २ जुलै २००९ रोजी आरोपींचा कुत्रा मयत श्यामराववर भुंकला होता. त्यामुळे श्यामरावने कुत्र्याला मारले. त्यावरून आरोपींनी श्यामरावला काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.
कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून, आरोपी पुतण्याची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 9:46 PM
विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली.
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचे अपील फेटाळले