शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

धक्कादायक! अनियंत्रित बस विद्यार्थ्यांच्या घाेळक्यात शिरली; एकाचा मृत्यू, दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 12:07 PM

बसच्या चाकात अडकून फरफटत नेले; दोघे चाकांच्या मधून बाहेर पडल्याने बचावले

काेराडी (नागपूर) : विद्यार्थ्यांना घेऊन नागपूर शहराच्या दिशेने निघालेली स्कूल बस अनियंत्रित झाल्याने, राेडलगत वाहनाची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घाेळक्यात शिरली. त्यामुळे एका विद्यार्थी बसला अडकला व थोडा दूर घासत गेला. दाेघे बसच्या खाली येत, दाेन्ही चाकांच्या मधून बाहेर आल्याने थाेडक्यात बचावले. घासत गेलेल्या विद्यार्थ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना काेराडी (ता.कामठी) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हसाळा येथे मंगळवारी (दि. २२) दुपारी २.५१ वाजताच्या सुमारास घडली.

सम्यक दिनेश कळंबे (१४, रा.बाराखाेली, इंदाेरा, नागपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सम्यक म्हसाळा (ता. कामठी) येथील मेरी पाॅस्टपीन स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकायचा. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ताे त्याच्या मित्रांसाेबत राेडलगत ऑटाेची प्रतीक्षा करीत उभा हाेता. काही वेळाने त्याच्या शाळेची एमएच-४०/एटी-०४८७ क्रमांकाची स्कूलबस विद्यार्थ्यांना घेऊन आली. काही कळण्याच्या आत ती बस अनियंत्रित झाली आणि समाेर असलेल्या कारला धडक देत, राेडलगत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घाेळक्यात शिरली.

Video | बसच्या चाकात अडकून फरफटत नेले, दोन विद्यार्थी चाकांच्या मधून बाहेर पडल्याने बचावले..

यात सम्यक बसला अडकला, तर दाेघे विद्यार्थी बसच्या खाली आले. मात्र, ते दाेन्ही चाकांच्या मध्ये आल्याने त्यांना दुखापत झाली नाही. सम्यक बससाेबत काही दूर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला बसच्या चाकापासून काढले आणि लगेच नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. अंबादास रामटेके, रा.शांतीनगर, नागपूर असे स्कूल बस चालकाचे नाव आहे. वृत्त लिहिस्ताेवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

विजेच्या खांबाला धडक

सम्यक बसला अडकताच, नागरिक चालकाच्या दिशेने धावत त्याला बस थांबविण्याची सूचना करीत हाेते. त्या बसने समाेर असलेल्या दाेन कारला धडक देत राेडलगत असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिली. त्या खांबाजवळ काही स्कूल व्हॅन आणि विद्यार्थिनी उभ्या हाेत्या. बस आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पळ काढला. त्यातच ती बस खांबावर आदळली. खांब वाकल्याने विजेच्या ताराही तुटल्या हाेत्या. अपघात हाेताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी केली हाेती.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीSchoolशाळाnagpurनागपूर