एकही नगरसेवक विजयी नाही : लक्षणीय मतेही नाही कमलेश वानखेडे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे इंजिन ट्रॅकखाली उतरले. गाडीला एकही डबा उरला नाही. मनसेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत मनसे टिकाव धरणार नाही, असे भाकीत आधीच वर्तविले जात होते. ते तंतोतंत खरे ठरले. संघटनात्मक शक्तीचा अभाव, ऐनवेळी प्रशांत पवार यांनी दिलेला राजीनामा व शिवसेनेला मिळालेली पसंती यामुळे मनसेचे पुरते गणितच बिघडले. मनसेच्या अर्ध्याहून जास्त उमेदवारांना तर अपक्ष उमेदवारांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत. मनसेच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही धोक्याची घंटा आहे. महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत मामा धोटे व विकास खोब्रागडे हे दोन नगरसेवक निवडून आले होते. २०१२ मध्ये मामा धोटे यांना मनसेने तिकीट नाकारले. त्यामुळे ते अपक्ष म्हणून लढले. त्यांची पत्नीही अपक्ष म्हणून लढली. दोघांचाही पराभव झाला. मात्र त्यांनी लक्षणीय मते घेतली. २०१२ मध्ये श्रावण खापेकर व विषया विकास खोब्रागडे हे दोन नगरसेवक विजयी झाले. मनसेला शहरात पाच वर्षे काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही एकही जागा वाढली नाही. नागपूरकरांनी मनसेला फारसा प्रतिसाद दिला नाही. मनसेच्या १० वर्षांच्या प्रवासानंतरही मनसेचा शहरात पाहिजे तसा विस्तार झाला नाही. पक्षाचे संघटन ताकदीने उभे राहिले नाही. शिवाय १० वर्षांत पक्षात मोठे चेहरे खेचण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना यश आले नाही. २०१७ ची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली. एवढ्या मोठ्या प्रभागात टिकाव धरणे
मनसेचे इंजिन ट्रॅॅकखाली
By admin | Published: February 27, 2017 1:56 AM