लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅचरोपॅथी ब्युटी आणि मसाज पार्लरच्या नावाआड चालणाऱ्या पॉश कुंटणखान्यावर बेलतरोडी पोलिसांनी सोमवारी रात्री सिनेस्टाईल छापा मारून तीन वारांगनांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी रोशनी दयाराम पांडे (वय ३३, रा. चक्रपाणीनगर) आणि तिच्यासाठी दलालाचे काम करणारा शुभम गोपनाथ नायर (वय २३, रा. वाडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली.पोलिसांच्या माहितीनुसार, रोशनी गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसायात सक्रिय आहे. मात्र, पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने तिने स्वत:च बेलतरोडी परिसरात २५ हजार रुपये भाड्याने आलिशान सदनिका घेतली. त्यात स्नेह नॅचरोपॅथी सेंटर, ब्युटी पार्लर आणि मेन्स, वूमेन्स तसेच किडस् मसाज पार्लरच्या नावाआड कुंटणखाना सुरू केला. या धंद्यात अनेक दिवसांपासून दलालाचे काम करणाºया नायरलाही तिने सोबत घेतले आणि अनेक विवाहित महिला तसेच तरुणींनाही ‘आॅन कॉल’ आपल्या कुंटणखान्याशी जोडले. दोन हजारांपासून ५ ते १० हजारांपर्यंत रक्कम उकळून रोशनी पांडे ग्राहकांना देहविक्रय करणाºया महिला-मुली पुरवीत होती. त्याची कुणकुण लागताच पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सापळा लावून कारवाई करण्याचे बेलतरोडी पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी रोशनीसोबत तीन हजारात सौदा पक्का केला. पैसे मिळताच रोशनीने बनावट ग्राहकाला एक तरुणी आणि दोन विवाहित महिला उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर रोशनीच्या इशाºयावरून बाहेरच्या दारावर कुलूप लावण्यात आले आणि कथित पार्लर बंद असल्याचा देखावा निर्माण करण्यात आला होता.खिडकी तोडून कारवाईकारवाईसाठी धडकलेले पोलीस दारावर कुलूप बघताच चक्रावले. काही वेळेपूर्वीच आतमध्ये पाठविलेल्या ग्राहकाने विशिष्ट संकेत दिल्यामुळे आतमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची पोलिसांना खात्री होती. त्यामुळे पोलिसांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि नको अवस्थेत तिघींना पकडले. कारवाईची प्रक्रिया पार पाडून त्यांना सोडून देण्यात आले तर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाºया रोशनी पांडे आणि तिचा साथीदार शुभम नायर या दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. परिमंडळ ४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय तलवारे यांच्या नेतृत्वात निरीक्षक दिलीप साळूंखे, पीएसआय संदीप आगरकर, कविता कोकणे, हवालदार अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, नायक गोपाल देशमुख, प्रशांत सोनुलकर, वर्षा चंदनखेडे आणि सपना शर्मा यांनी ही कामगिरी बजावली.