शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

 नागपुरात स्कीन क्लिनिकच्या नावाखाली कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:58 AM

स्पा आणि स्कीन क्लिनिकच्या नावाखाली सुरू असलेल्या मानेवाड्यातील एका कुंटणखान्यावर परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करताना रंगेहात पकडले.

ठळक मुद्देडीसीपी भरणेंच्या पथकाचा छापा : तीन महिलांना पकडले : कुंटणखाना चालविणारे दोघे गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्पा आणि स्कीन क्लिनिकच्या नावाखाली सुरू असलेल्या मानेवाड्यातील एका कुंटणखान्यावर परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करताना रंगेहात पकडले. हा कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून आक्षेपार्ह्य साहित्य जप्त केले. अत्यंत पॉश असा हा कुंटणखाना गेल्या चार महिन्यांपासून सुरू होता, असे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे.रंजित पांडुरंग मस्के (वय ३७) आणि रवी सूरजदास उदयकर (वय ३५, दोघेही रा. पारडी) अशी आरोपींची नावे आहेत. मस्के आणि उदयकरच्या जोडगोळीने मानेवाड्यातील शारदा चौकात एक सदनिका १२ हजार रुपये महिना भाड्याने घेतली होती. त्यांनी सदनिकेत मियामी स्पा आणि स्कीन क्लिनिक सुरू केले होते. वेश्याव्यवसाय करणाºया अनेक महिला-मुलींच्या ते संपर्कात होते. त्यांच्याकडे पाच ते दहा वारांगना दिवसभरात येत जात होत्या. येथे येणाºया ग्राहकाला वेगवेगळी रक्कम घेऊन ते रूम आणि महिला किंवा तरुणी उपलब्ध करून द्यायचे. १५०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतचा मोबदला घेऊन एक तासासाठी महिला-मुलगी उपलब्ध करून द्यायचे. या कुंटणखान्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाºयांना शहानिशा करण्यास सांगितले. कुंटणखाना सुरू असल्याची खात्री पटल्याने डीसीपी भरणे यांनी आज दुपारी ४ च्या सुमारास तेथे पंटरला (बनावट ग्राहक) पाठविले. पंटरकडून आरोपी मस्के आणि उदयकरने १५०० रुपये घेतल्यानंतर त्याला एक महिला आणि दोन तरुणी दाखविल्या. त्यानंतर त्याला एक रुम उपलब्ध करून दिली. कुंटणखान्याच्या परिसरातच पोलिसांचा ताफा दबा धरून होता. पंटरने इशारा करताच पोलिसांनी तेथे छापा घातला. देहविक्रय करणाºया तीन महिलांना तसेच आरोपी मस्के आणि उदयकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना हुडकेश्वर ठाण्यात नेण्यात आले.पोलीस ठाण्यात आरोपींना विचारपूस केली असता कुंटणखाना चालविणारा मस्के तसेच उदयकर अनेक दिवसांपासून या गोरखधंद्यात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले.एक घटस्फोटित, दोघी बहिणीविशेष म्हणजे, मस्केची एक दुरावलेली मैत्रिण या धंद्यात अजूनही सक्रिय असून, तिनेच याबाबत बोभाटा केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कुंटणखान्यावर पकडलेल्या गेलेल्यापैकी एक महिला दोन मुलांची आई आहे. तिने पतीपासून घटस्फोट मिळावा म्हणून, न्यायालयात प्रकरण नेले असून, या कुंटणखान्यावर एक महिन्यापासून देहविक्रय करीत असल्याचे तर अन्य दोघी बहिणी आहेत. त्या प्रारंभी एका हॉस्पिटलमध्ये काम करायच्या. या धंद्यात कमी वेळेत जास्त रक्कम मिळत असल्याने त्यांनी येथे सेवा देणे सुरू केल्याचे समजते.---ठाण्यातील पोलीस अनभिज्ञविशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या या कुंटणखान्याकडे हुडकेश्वर पोलिसांचे लक्ष नव्हते, ही बाब संशयास्पदआहे. त्याचमुळे की काय, पोलीस उपायुक्त भरणे यांनी या कारवाईत नंदनवनचे सहायक पोलीस निरीक्षक काचोरे, एपीआय बावणकर, मनोज, बजरंग, अशोक तसेच इमामवाड्याचे सुशांत, आरपीटीसी सचिन, उत्कर्ष राऊत यांच्याकडून ही छापामार कारवाई करून घेतली.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर